दैनिक राशिभविष्य
सोमवार, ५ फेब्रुवारी २०२४
पौष कृष्ण दशमी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
"आज वर्ज्य दिवस आहे."
मेष:- संमिश्र दिवस आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सासुरवाडीचे काम करते लागेल.
वृषभ:- सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱयांना चांगली बातमी मिळू शकेल. पित्याची सेवा करा. प्रवास घडतील.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. आरोग्यात सुधारणा होईल. कामे पुढं सरकतील. जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.
कर्क:- धार्मिक उपासना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. सिद्धी प्राप्त होईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.
सिंह:- कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना उत्तम यश मिळेल. संशोधनात प्रगती होईल. भाऊबंद भेटतील. संकट टळेल.
कन्या:- अंदाज अचूक ठरतील. ग्रंथ मैत्रीचा आनंद घ्याल. कार्यकुशलता वाढेल. न्याय मिळेल.
तुळ:- कुटुंब स्थानात चंद्र आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मन आनंदी राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
वृश्चिक:- तृतीय स्थानातील रवीशी चंद्राचा शुभ योग आहे. पराक्रम गाजवाल. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- अजूनही फारशी अनुकूलता नाही. मागील कामे पुढे चालू अशी परिस्थिती आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे पुढे सरकतील.
मकर:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. चांगली वागणूक मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ:- प्रतिकूल रवी मुळे आरोग्याच्या तक्रारी असल्या तरी सूर्य उपासना केल्यास त्या दूर होतील. नोकरीत अधिक काम करावे लागेल.
मीन:- उत्तम कालावधी आहे. सरकारी मान मरातब मिळू शकतो. उच्च अधिकाऱ्यांशी ओळखी होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment