बिईंग डॉक्टर सुपर स्पेशालिटी क्लिनीक आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपतर्फे व्हॅलेंटाईन डे निमीत्त हृदयरोग प्रतिबंधात्माक उपाय आणि संगीत रजनी
बिईंग डॉक्टर सुपर स्पेशालिटी क्लिनीक आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपतर्फे व्हॅलेंटाईन डे निमीत्त हृदयरोग प्रतिबंधात्माक उपाय आणि संगीत रजनी
कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क
सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात अनेक आजारांना तरूण वयातच आमंत्रण मिळते. याचे संकेत शरीर वेळोवेळी देतच असते. अशा आजारांचा सखोल अभ्यास करून बिईंग डॉक्टर सुपर स्पेशालिटी क्लिनीकचे डॉ. युवराज पोवार यांनी प्रिव्हेंटीव कार्डीयॉलॉजी ही संकल्पना समोर आणली. या प्रभावी उपचार पध्दतीच्या प्रबोधन प्रचारासाठी नुकताच रविवारी १ संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. व्हॅलेंटाईन डे निमीत्ताने सदर कार्यक्रम शाहू स्मारक येथे पार पडला. डॉ. युवराज पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संगीत कार्यक्रम 'ये दिल न होता बेचारा' कोल्हापूरातील म्युझिक लव्हर्स ग्रुपने सादर केला. सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक बांधीलकी जपत समाजामध्ये ज्यांनी समाजासाठी चांगले कार्य केले आहे. अशा दोन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. युवराज पोवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. यूवराज पोवार यांचा सन्मान म्युझीक लव्हर्स ग्रुपचे आशुतोष साळोखे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये म्युझिक लव्हर्स ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत सन्मान करण्यात आले. त्यामध्ये जेष्ठांचा आधारवड समजले जाणाऱ्या मा. विनायक कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. कुलकर्णी यांनी निवृत्तीनंतर जेष्ठ नागरीकांच्या जिवनातील एकटेपणा नाहीसा करून त्याच्या आयुष्यात आनंदाची बाग पुरविण्याचे कार्य तसेच गोर-गरीब लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचे सत्कार्य ते करत आहेत. या त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव डॉ. युवराज पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. दुसरा सन्मान हा डॉ. अनंत कुलकर्णी यांचा करण्यात आला. १९८० साली डॉक्टर ही पदवी घेऊन २ वर्षे वैद्यकीय नोकरी केली आणि या नोकरीचा राजीनामा देऊन अधिवासी, वनवासी, अशा दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या या प्रवासात रक्तदान यावर खुप चांगले कार्य केले. साखळी पध्दतीने ठिकठिकाणी ब्लड बँक उभ्या केल्या. महाराष्ट्रातच नाहीतर देशभरात त्यांनी वैद्यकीय सेवा, रक्तदानावर प्रबोधन कार्य, एड्स जनजागरण सेवा अगदी तळागाळात, ग्रामीण भागात, दुर्गम भागात, अदिवासी, धनगर वाड्यात अगदी मोफत कार्य करून एक चांगले सत्कार्य करत आहेत. या त्यांच्या कार्याचा गौरव डॉ. युवराज पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये संगीत रजनी सोबत रसिक प्रेक्षकांना हृदयरोग होऊ नये याकरिता
तसेच हृदयरोग झालेनंतर कोणती काळजी घेतली जावी यावर डॉ. पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमामध्ये हृदयरोगावरती प्रश्नोंतरांचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. पोवार यांचेकडून हृदयरोग संदर्भात प्रतिबंधक उपचारपध्दती यावर मार्गदर्शन झाले. प्रेक्षकांमधून बरेच प्रश्न विचारले गेले. त्यामध्ये तरूण वयात हृदयरोग होवू नये यावर काय केले पाहिजे आणि हृदयरोग झालाच तर त्याची काळजी कशी घ्यावी?, एन्जोप्लॅस्टी झालेल्या पेशंटना भविष्यात परत त्रास होऊ नये यासाठी काय करावे?, हृदय रोगाचे प्रमाण पुरुष आणि स्त्री यामागे कोणाचे जास्त आहे?, हृदयरोग होऊ नये याकरिता आहारामध्ये पथ्य-पाणी काय पाळावे?, एलडीएल आणि एचडीएल म्हणजे काय आणि त्याचा हृदयरोगाशी काय संबंध आहे ? अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. युवराज पोवार यांनी प्रेक्षकांना देऊन त्यांचे समाधान केले. तसेच ज्यांना अजुन काही शंका असतील त्यांनी आमच्या क्लिनीकमध्ये येऊन माझ्याशी चर्चा करावी असे डॉ. पोवार यांनी येथे नमूद केले.
अशा या हृदय आनंदी आणि स्वच्छंदी कसे ठेवावे याकरिता म्युझिक लर्व्हस ग्रुपतर्फे संगीत रजनीचे आयोजन केले होते. दिवसभराच्या धावपळीतून ताण-तणाव दुर करावा याकरिता संगीत हे एक चांगले माध्यम आहे आणि असे प्रत्येकाणे करावे असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या कलाकारांनी हृदय या थीमवर आधारीत ये दिल ना होता बेचारा ही हिंदी गाण्यांची मैफील सादर केली. ये दिल ना होता बेचारा, दिल में तुझे बिठाके, दिल तो बच्चा हैं जी, दिल में आग लगाए, दिल की बाते कहीं लब पे न आ जाये, दिल में बजी गीटार, अजी ऐसा मौका कहाँ मिलेगा, मेरा दिल तेरे लिए धडकता हैं अशा सुमधूर हिंदी नव्या व जुन्या गाण्यांचे सादरीकरण करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. याकार्यक्रमाकरिता सुत्र संचलन योगिनीताई खानोलकर आणि हुबळीहून आलेले राहुल देवगोगी या दोघांनी आपल्या सुंदर भाषाशैलीमध्ये सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांकरिता ३ लकी ड्रॉ काढून प्रेक्षकांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म्युझीक लव्हर्स ग्रुपचे शिरीष पाटील यांनी केले.

Comments
Post a Comment