कोळे गावात वीर जवानांचा सत्कार सोहळा संपन्न
सांगोला (कोळे) ३ सिटी न्यूज नेटवर्क
प्रति वर्षाप्रमाणे अहोरात्र देशासाठी लढणाऱ्या वीर जवान आणि वीर माता वीर पत्नींचा शिव हिंदुस्थान मित्र मंडळ कोळे तालुका. सांगोला यांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला. या मंडळाचे दहावे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमास वीर मातांचा, वीर पत्नींचा साडी चोळी देऊन माजी सरपंच - वंदनाताई सरगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिव हिंदुस्तान मंडळाचे कौतुक शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत भैया देशमुख यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अँड. सचिन देशमुख यांनी सूतोवाच केले. आम्ही हा सोहळा कधीच चुकत नाही नेहमी उपस्थित असतो हे कार्य अतिशय चांगले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते डॉ. पीयूष दादा साळुंखे पाटील यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला कोळे गावची सरपंच मा. पैलवान हरिभाऊ सरगर , उपसरपंच डॉ. सादिक पटेल, माजी सरपंच वंदनाताई सरगर, मारुती सरगर , कॅप्टन रावसाहेब साळुंखे, कॅप्टन दिलीप यादव आदी या कार्यक्रमाला कोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडेकर यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक आलदर (आबा) यांनी केली




Comments
Post a Comment