दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 सोमवार, ११ मार्च २०२४.






 फाल्गुन शुक्ल प्रतिपदा. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


"आज उत्तम दिवस आहे."  


मेष:- आवडती वस्तू विकत घेण्यासाठी खर्च कराल. भ्रमंती घडेल. इलेक्टरीनिक वस्तू खरेदी घडेल. कमी बोलणे हिताचे आहे. 

     

वृषभ:- उत्तम दिवस आहे.  स्वप्ने साकार होतील. भेटवस्तू मिळतील. मित्र मंडळी भेटतील.

 

मिथुन:- नोकरीत बदल संभवतात. कनिष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल.


कर्क:- मोठ्या घडामोडी घडतील. दूरचे प्रवास संभवतात. अचानक लाभ होतील.

 

सिंह:-  संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानातील बुध अर्थप्राप्ती करून देईन. स्त्री धन वाढेल.

  

कन्या:- राशी स्वामीची स्वराशीवर दृष्टी आहे. कामाचा उरक वाढेल. जनशक्ती पाठीशी उभी राहील. नवीन व्यवसाय सुरू कराल.   

 

तुळ:- उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. व्यवसाय वाढेल. मोठी उलाढाल अपेक्षित आहे. वेळ दवडू नका.   

 

वृश्चिक:- शेअर्स मध्ये लाभ मिळवून देणारा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. अचानक लाभ होतील.


धनु:- बगिच्यात काही बदल घडतील. व्यवसाय वाढेल. पाळीव पशूंचा लाभ मिळेल. घर बदलण्यास चांगला दिवस आहे.  

 

मकर:- लेखकांना उत्तम दिवस आहे. पुस्तक प्रकाशन करण्यास उत्तम कालावधी आहे. इतरांना प्रेरक वाटेल असा पराक्रम कराल. 

 

कुंभ:- विक्री व्यवसायात लाभ होतील. कोर्टात यश मिळेल. वक्तृत्व गाजेल. मेजवानी मिळेल. 

 

मीन:- तुमच्या राशीत चंद्र बुध युती आहे. उत्साह वाढेल. अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन खरेदी होईल.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments