दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 रविवार, ३ मार्च २०२४. 







माघ कृष्ण सप्तमी/अष्टमी. शिशिर ऋतू.  शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे" *भानू सप्तमी, काळाष्टमी* 


चंद्रनक्षत्र - अनुराधा/जेष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. शनिशी केंद्र योग्य आहे. कायदे पालन करा. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा तणाव वाढल्याने नियोजित घरगुती कार्यक्रम बदलतील. पत्नीशी मतभेद संभवतात.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक वृद्धी होईल. व्यवसाय वाढेल. मात्र दगदग वाढेल. दिरंगाई टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अति उत्साह टाळणे हिताचे आहे. एखादी अप्रिय घटना घडू शकते.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरगुती कामात गुरफटून जाल. नियोजन चुकेल. प्रलोभनांना बळी पडाल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आनंदी दिवस आहे. योग्य सल्ला मिळेल. शौर्य दाखवाल. मात्र आरोग्याची काळजी घ्या.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक सहलीचे नियोजन कराल मात्र प्रवासात अडथळे येतील. गुंतवणूक अडचणीत येऊ शकते.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. स्थावर संबंधीत वाद निर्माण होतील. भाडेकरू त्रास देतील.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. विनाकारण वाद ओढवून घेऊ नका. लेखकांनी सावध राहावे. सुनेची चिंता वाटेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. काही चांगल्या घटना घडतील. कमी बोलणे हिताचे आहे. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  कामात व्यत्यय येईल. नियोजन बिघडेल. आध्यत्मिक लाभ मिळतील. ध्यान धारणा करा.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मोठे खर्च वाढतील. अचानक एखादे संकट सामोरे येऊ शकते. सूर्य उपासना करा. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments