दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

गुरूवार, ७ मार्च २०२४. 







माघ कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज शुभ दिवस आहे" *भागवत एकादशी* 


चंद्र नक्षत्र - उत्तराषाढा/ श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरीच्या ठिकाणी सावधानता बाळगावी लागेल. राजकीय क्षेत्रात संयम बाळगावा. स्थान बदल संभवतो.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धार्मिक यात्रा करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म करा. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वृद्धी घडेल. अनुकूल गुरू योग्य मार्ग दाखवेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वादविवाद टाळा. कोर्ट कचेरीत वेळ वाया जाईल. स्वतंत्र व्यवसायाचा विचार सध्या नको.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अर्थप्राप्ती होईल. मात्र नैतिकता सांभाळा. चोरीचे भय आहे. गरजूना मदत करा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संतती बाबत चिंता वाटेल. मोठी गुंतवणुक आज टाळा. पत्नीची काळजी घ्या.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) स्थावर संपत्ती बाबत काही अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवस्याईक जागेत बदल संभवतो. मित्र भेटतील. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. शौर्य दाखवण्याची वेळ आहे. मात्र अनैतिक कामे टाळा. नवीन विद्या शिकायला मिळतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उधारी वाढेल. आर्थिक चिंता सतवतील. जुने हिशोब काळजीपूर्वक पूर्ण करा. संततीची काळजी घ्या.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. गरम पाण्यापासून काळजी घ्या.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. खकारच वाढतील. जुनी देणी द्यावी लागतील. विनाकारण आक्षेपार्ह लेखन करू नका. 

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. वाहन सुख लाभेल. खरेदी होईल. व्यापारात लाभ होतील. बोलताना काळजी घ्या.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments