सामजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. किशोर घाटगे यांचा वाढदिवसविविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला यावेळी सी पी र चौक येथे कोल्हापूर थाळी तसेच गंगावेस उत्तरेश्वर थाळी येथे गरीब व गरजू महिला व नागरिकांना मोफत अन्न वाटप करण्यात आले.कोल्हापूर थाळीत भात, आमटी, चपाती, शिरा, भाजी असा मेनू तर उत्तरेश्वर थाळीत अंडाकरी, भात, चपाती, लाडू, खाजा असा बेत होता याचा 400 लोकांनी लाभ घेतला गोकुळ शिरगांव येथे हिंदू महासभेचे नंदू घोरपडे व सिटीझन फोरम चे प्रसाद जाधव यांनी वृक्षारोपण केले
सी. पी. र सह विविध रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले,25 गरीब व गरजू विध्यार्थी दत्तक घेऊन शैक्षनिक साहित्य मोफत देण्याचा मनोदय जाहीर करण्यात आला या कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दादू शिंदे, उदय प्रभावळे, सम्राट शिर्के, रोहन गवळी, मनोहर सोरप, रियाज बागवान,कपिल नाळे योगेश केरकर, प्रकाश घाटगे,महादेव पाटील, अनंत पाटील, रोहन शिंदे, बंडा माने आदी नि परिश्रम घेतले
.jpg)
Comments
Post a Comment