देश धर्मासाठी भगव्याशी निष्ठावंत कार्यकर्ता : किशोर घाटगे
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
किशोर घाटगे वयाच्या १५ वर्षापासून देव देश धर्मासाठी भगव्याशी निष्ठावंत कार्यकर्ता बजरंग दलाचा शहरप्रमुख म्हणून सामाजिक जीवनाची सुरुवात करताना 'विशाळगड मुक्ती आंदोलन ते इचलकरंजीतील ईदगाह मैदान आंदोलन राज्यभर गाजले भा.ज.पा. ची नवीन जडणघडण झाली त्यात मंत्रीचंद्रकातदादा पाटील व महेश जाधव यांच्या साथीने व मार्गदर्शनाने भाजपा ची कोल्हापूरातील पेठामधील गल्लीबोळात नेणेसाठी व दादांनी पाहिले पदवीधर आमदार व्हावे यासाठी भरीव योगदान दिले. कोल्हापूर, शहरातील प्रत्येक सामाजिक व राजकीय आंदोलनातील आश्वासक चेहरा टोल आंदोलन, इदगाह आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, हिंदूत्वावादी संघटनांचा शिवअक्रोश मोर्चा, खंडपीठ आंदोलन यासह आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने यशस्वी केलेले गंगावेश ते पंचगंगा रस्त्याचे आंदोलन, पंचगंगाप्रदूषणासह पंचगंगा सुशोभिकरण व मंदीराचे संवर्धनासाठी केलेली यशस्वी आंदोलने करण्यात, कोरोना काळात केलेली मदत, संयुक्त उत्तरेश्वर व शुक्रवार पेठेत शिवजयंती उत्सव सुरु करण्यात योगदान, सकल हिंदू समाज व सकल मराठा समाज यांच्या कार्यकर्ता व समाजोउन्नतीसाठी प्रयत्न शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली,शालेय विद्यार्थ्यांना सवलतीत वही वाटप, गरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कोरोनासह पुरग्रस्तांना मदत, पुरस्थितीत केलेले अखंड काम, महिला बचतगटांना मार्गदर्शन, मदत व वाटप, संजय गांधी निराधार योजना उत्तरचे अध्यक्ष म्हणून काम करताना ४५०० पेक्षा अधिक विधवा महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ देताना एजंटगिरी मोडली अनुदान वाढीसाठी शासनाकडे पाठपुराव्या बरोबरच मोफत अर्जाचे वितरण केले अजूनही रोज अखंडपणे लोकांना या कामासाठी भाई हे आपलेच नाव पहिला नजरेसमोर येते.
स्वामी विवेकानंद ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम करताना "एक राखी सीमेवरील जवानासाठी" हा उपक्रम देशभर अनुकरणीय ठरला. वृक्षारोपण २६/११ तील शहीदांना आदरांजली, मंत्रालयातील राष्ट्रध्वजाचे रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, यासह ट्रस्टच्या अनेक समाज उपयोगी उपक्रमाचे संयोजन हे सर्व करतना भाई आपल्याला अनेक खटले अंगावर घ्यावे लागलेत. गंभीर गुन्हे दाखल झालेत. ईदगाह मैदान केसमधून निर्दोष मुक्तता झाली तर फिर्यादी विरुध्द होलीक्रॉस शाळेच्या आंदोलनाची केस प्रलंबित आहेत. भाई मागे वळून पाहिले तर आपला समाजिक पिंड असून राजकीय जीवनात आपल्या पदरात आपले क्षमतेपेक्षा खूप कमी पडले आहे. आपला प्रामाणिकपणा, भिडस्त स्वभाव, परखडपणा, स्वाभिमान याचा कुठतरी अडसर होतो का ? यांचे आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. परंतु आम्ही दिलेली भाईची जनहिताची भाईगिरी जोरात करा आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.

Comments
Post a Comment