दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 गुरूवार, ९ मे २०२४.






 वैशाख शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज क्षय तिथी आहे"  


चंद्र नक्षत्र - कृतिका/रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कधीकधी अहंकार अडचणींचा ठरतो. आज त्यासाठी खर्च केला जाईल. प्रतिष्ठा पणाला लागेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल मंगळाशी चंद्राचा शुभ योग आहे. व्यापारात लाभ होईल. स्पर्धेत बाजी माराल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी मन रमेल. खर्च वाढेल. सहकाऱ्यांना मेजवानी द्याल. आनंदी राहाल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमचा आत्मविश्वास आज भरपूर असणार आहे. शत्रू बिचकून माघार घेतील. आर्थिक आवक वाढेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुम्ही  स्पर्धेला घाबरत नाहीत. आज त्याचा प्रत्यय येणार आहे. अनुकूल चंद्र साहाय्य करेल.

   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. खर्चात वाढ दर्शवते. विनाकारण वाद होऊ शकतात. संयम ठेवा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम स्थानी चंद्र आहे. अनुकूल मंगळाच्या कृपेने धनलाभ होईल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. मात्र प्रेमात धोका संभवतो. स्वतःची फसवणूक टाळा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक साठी अधिक मेहनत करावी लागेल. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू डोके वर काढतील. स्वतःची गुपिते बाहेर सांगू नका.

   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नफा वाढणार असला तरी नेहमीच नियोजन बदलावे लागेल. तडजोड करावी लागेल. भावंड मदत करतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. मनासारखी कामे होणे अवघड आहे. महत्वाचे करार आज नकोत. 

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नेहमीपेक्षा अधिक आक्रमक व्हाल. चुकीचे निर्णय होऊ शकतात. आर्थिक आवक वाढेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


९ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात. कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात.


व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, मिल्ट्री, पोलीस, इंजिनीयर, लोखंड. बांधकाम क्षेत्र.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग:- तांबडा.


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.


 - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments