दैनिक राशिभविष्य
सोमवार, २९ जुलै २०२४.
आषाढ कृष्ण नवमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे."
चंद्र नक्षत्र - भरणी/कृतिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष/ (दुपारी ४.४५ नंतर) वृषभ.
मेष:- चंद्राचा अनुकूल शनिशी लाभ (शुभ) योग आहे. दिवसाची सुरुवात अत्यंत उत्साहात होणार आहे. उत्तरार्ध अचानक धन प्राप्ती करून देणारा आहे. घरगुती कामात वेळ जाईन.
वृषभ:- दिवसाची सुरुवात फारशी आशादायक नसली तरी नंतर ग्रहमानाचा आनंद घ्याल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रलोभने टाळा.
मिथुन:- दिवसाच्या सुरुवातीला चंद्र अनुकूल आहे. महत्वाची कामे पूर्ण करवून घ्या. मौल्यवान वस्तू खरेदी होईल.
कर्क:- उत्तम दिवस आहे. मनासारख्या घटना घडतील. अचानक खराचास सामोरे जावे लागले तरी त्यातून पुढे मोठे संकट टळेल. नोकरीच्या ठिकाणी विनाकारण गैरसमज होऊ शकतो.
सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. शत्रूंचा त्रास दीर्घ काळासाठी थांबू शकतो. हरवलेले काही सापडेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरीत किरकोळ कटकटी संभवतात.
कन्या:- दिवसाच्या सुरुवातीला अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही एखादी सुखद घटना घडेल. उत्तरार्ध प्रवासात त्रासदायक ठरू शकतो.
तुळ:- सुरुवातीला चंद्र अनुकूल आहे. त्या याकाळात कमी पूर्ण करा. पंचम शनी चंद्र शुभ योग उत्तम सहकार्य करेल. शेअर्स मधून यश मिळेल.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. आर्थिक लाभ होतील. पत्नीशी मतभेद संभवतात.
धनु:- संमिश्र दिवस आहे. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल. आरोग्यची काळजी घ्या. आर्थिक यश मिळेल. पाण्याजवळ लाभ होतील.
मकर:- कौटुंबिक सौख्य मिळेल. सामाजिक कार्य घडेल. समाधान लाभेल. संततीसी संवाद साधा. शेअर्स मध्ये मोठी जोखीम नको.
कुंभ:- आनंद देणारा दिवस आहे. कामाचा उत्साह वाढेल. आज महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. लेखकांना उत्तम यश मिळेल.
मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. मात्र प्रिय नातेवाईकांची नाराजी अनुभवाल. पाण्यापासून काळजी घ्या.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
Comments
Post a Comment