दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

गुरूवार, ५ सप्टेंबर २०२४.





 भाद्रपद शुक्ल द्वितीया. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)


"आज शुभ दिवस आहे" 


चंद्र नक्षत्र - हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ योग आहे. व्यापार वाढेल. गुणवतणुकीसाठी अनुकूल दिवस आहे. 


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. भेटवस्तू मिळतील. दिवस मजेत व्यतीत होईल.

 


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृह सजावट कराल. घरात मोठे बदल कराल. वाहन सुख मिळेल. शेजारीच मदत मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अर्थकारण मजबूत होईल. नवीन व्यापार संधी मिळतील. वादक आणि इतर कलाकारांना उत्तम दिवस आहे.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. गायकांना चांगले यश मिळेल.

   

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. नवीन खरेदी होईल. मौज करण्यासाठी खर्च कराल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. गुंतवणूक लाभ देईल. मित्र मंडळी भेटतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महिलांकडून लाभ होतील. सौंदर्य प्रसाधने आणि तयार कपडे विकणाऱ्यांना भरपूर फायदा होईल. 

    

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय वाढेल. मोठी आर्थिक उलाढाल होईल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाजू भक्कम राहील. येणी वसूल होतील. व्यापार वाढेल. मात्र खर्च देखील वढणार आहे.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. भौतिक सुखे प्राप्त होतील. पत्नी खुश राहील.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments