महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा शानदारपणे प्रारंभ
शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीज् पुरस्कृत एच टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा शानदारपणे प्रारंभ:, राम, आशिष, अर्णव, दिव्या अनुष्का व सानिया आघाडीवर
कोल्हापूर ५ सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धीबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने मांगल्य मल्टीपर्पज सभागृह, मेनन बंगल्यासमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एच टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) मुलांच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज गुरुवार पासून दिमाखात सुरु झाल्या आहेत..
आज सकाळी नऊ वाजता गोकुळचे संचालक व युथ बँकेचे चेअरमन डॉक्टर चेतन नरके,युवा उद्योजक व कोल्हापूरच्या बुद्धिबळाचे आश्रयदाते विश्वविजय खानविलकर, एसबी रिशेलर्सचे ए जी एम दिलीप पाटील, हृदय स्पर्श फाउंडेशनचे पद्माकर कापसे व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्रा.अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, स्पर्धेच्या मुख्य पंच पुण्याच्या आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोत्री,उपमुख्यपंच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, स्पर्धा प्रमुख आरती मोदी, स्पर्धा सचिव अनिश गांधी, प्रशांत पिसे, अमित मोदी इ.प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एस.बी. रिशेलर्स व सिनर्जी ग्रीन ( शिरगावकर उद्योग समूह चे सचिन शिरगावकर ) प्रायोजक आहेत. त्याचबरोबर चितळे डेअरीचे गिरीश चितळे यांचेही सहकार्य लाभले आहे.
उद्घाटना नंतर सकाळी बरोबर दहा वाजता पहिल्या फेरीस प्रारंभ झाला.महाराष्ट्रातून 104 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले यापैकी 64 मुले व 40 मुली आहेत.एकूण 59 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
आज झालेल्या दुसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अग्रमानांकित मुंबईचा राम परब,द्वितीय मानांकित अहमदनगरचा आशिष चौधरी, सातवा मानांकित पुण्याचा अर्णव कदम, नववा मानाकीत नागपूरचा साई शर्मा, बारावा मानांकित सांगलीचा आदित्य चव्हाण, तेरावा मानांकित पुण्याचा हितांश जैन,चौदावा मानांकित सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण, पंधरावा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी, सोळावा मानांकित ठाण्याचा आयुष काबरा, एकविसावा मानाकित नागपूरचा मयांक हेदाऊ, पंचविसावा मानांकित मुंबईचा आदित्य कदम व 32 वा मानांकित सातारचा रेहान गोहेल हे बाराजण दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. तर तृतीय मानांकित पुण्याचा अविरत चव्हाण, पाचवा म्हणा की पुण्याचा ललितादित्यअय्यधर भूमीनाथन, सहावा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, अकरावा मानांकित कोल्हापूरचा अभय भोसले, अठरावा मानांकित पुण्याचा ओम रामगुडे, विसावा मानांकित कोल्हापूरचा वरद आठल्ये, 23 वा मानांकित अहमदनगरचा आय्या आयुष उमेश व 28 वा मानांकित संभाजीनगरचा सुदीप पाटील हे आठजण दिड गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहे.
मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरची दिव्या पाटील,द्वितीय मानांकित पुण्याची अनुष्का कुतवल, तृतीय मानांकित जळगावची सानिया तडवी, चौथी मानांकित सांगलीची ईश्वरी जगदाळे, पाचवी मानांकित कोल्हापूरची दिशा पाटील, सहावी मानांकित पुण्याची राजराजेश्वरी देशमुख, सातवी मानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर, आठवी मानांकित पुण्याची मानसी टिळेकर व नववी मानांकित ठाण्याची गौरी सारस्वत या नऊजणी दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. 37 वी मानांकित कोल्हापूरची सृष्टी जोशीराव दिड गुणासह द्वितीय स्थानावर आहे.
या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. स्विस लीग पद्धतीने क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता स्पर्धेची चौथी फेरी सुरू होणार आहे.

Comments
Post a Comment