दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

सोमवार, ७ ऑक्टोबर २०२४. 






अश्विन शुक्ल चतुर्थी/पंचमी. शरद ऋतू. क्रोधी नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. वृश्चिक. (विष्टी करण शांती करून घ्यावी)


"आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे." *ललित पंचमी*


मेष:- आज महत्वाची कामे नकोत. अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू पराभूत होतील. स्त्री धन वाढेल. अनैतिक कामे करू नका. 

     

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानवा लागेल. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.

 

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद टाळा. आर्थिक लाभ होतील.


कर्क:- घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून बरे लाभ मिळतील. अचानक धनलाभ संभवतो.

 

सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नोकरीत त्रास होऊ शकतो. घरगुती केम कराल.

  

कन्या:- आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.

 

तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल.   

 

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. भगिदरी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल.


धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. हानी होऊ शकते.

 

मकर:- लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.

 

कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सला मोलाचा ठरेल. कामाचा वेग वाढेल.

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments