दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २८ जानेवारी २०२५.
पौष कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - पू. षा./ (सकाळी ८.५९ नंतर) उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु/(दुपारी २.५२ नंतर) मकर.
"आज वर्ज्य दिवस आहे."
मेष:- चंद्राचा शुक्राशी लाभ योग, हर्षलशी त्रिकोण योग, बुधाशी युती आणि मंगळाशी प्रतियुतील आहे. उत्तरार्धात अनुकूल ग्रहमान आहे. तीर्थयात्रा घडेल. हातून चांगले काम घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत सुखद अनुभव येतील.
वृषभ:- दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. मित्र मंडळी समवेत सहभोजन कराल.
मिथुन:- दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. शत्रूपिडा जाणवेल.
कर्क:- उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. येणी वसुली होतील.
सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. योग्य सल्ला मिळेल.
कन्या:- चांगले ग्रहमान आहे. जुन्या वस्तू सापडतील. आरोग्य सुधारेल. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील.
तुळ:- दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल.
वृश्चिक:- उत्तराध अधिक अनुकूल असला तरी एकूणच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल.
धनु:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. नात्यातून लाभ होतील. योग्य गुरू मिळेल. सत्संग लाभेल. दानधर्म कराल.
मकर:- दिवसाचा पूर्वार्ध खर्चात टाकणारा आहे. वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. संध्याकाळ आनंदाची.
कुंभ:- सुरुवातीला उत्तम दिवस आहे. जुनी येणी वसूल होतील. आध्यत्मिक लाभ होतील. वास्तू साठी खर्च कराल. संध्याकाळ अपेक्षा भंगाची असू शकते.
मीन:- अत्युत्तम दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. अवघड वाटणारी कामे सोपी होतील. व्यवसाय वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
Comments
Post a Comment