महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

 महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी  धरणे आंदोलन 



कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क 


महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले . 

 संपूर्ण महाराष्ट्र‌भर गेल्या दहा वर्षामध्ये बँकांनी खेडे विभागात आणि दुर्गम भागात बँकेच्या शाखा उघड ऐवजी बैंक मित्र यांची नेमणूक करून एका विशिष्ट रकमेपर्यंत रोखीचे व्यवहार करून घेण्यास सुरुवाल केली आहे. याशिवाय नवीन खाते उघडणे सरकारच्या विविध योजना राबवणे आणि त्याचबरोबर बँकेचे इतर कार्य देखील करण्यामध्ये या बैंक मित्र यांचे सहाय्य घेण्यात येत आहे. सरकारच्या जनधन यासारख्या सर्व महत्वकांशी योजना राबवण्यामध्ये बैंक मित्र यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.



सुरुवातीला बैंक मित्रांच्या नेमणुका स्वतः करत असत पण गेल्या काही वर्षापासून बँका या नेमणुका कार्पोरेट एजन्सी मार्फत करत आहेत. महाराष्ट्र राज्यात बँक मित्रची संख्या वीस हजार वर आहे. त्यांना कुठल्याही सेवा व शर्ती नाहीयेत, सुरक्षितता नाही. त्यांना अत्यल्प कमिशन मिळते या प्रश्नाकडे आपणाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र स्टेट बैंक मित्र असोसिएशन यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्याचे निवेदन  जिल्हाधिकारीसो यांना सर्व बैंक मित्र यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक कोल्हापूर जिल्हा सागर भावके साहेब ,प्रशांत मोरे ,दादासो गुडाळकर, प्रमोद पाटील सचिन जाधव आदी  उपस्थित होते

Comments