दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

शनिवार, १७ मे २०२५




. वैशाख कृष्ण पंचमी. वसंत/ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसु नाम संवत्सर.राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


चंद्र नक्षत्र - पू. षा./ (संध्याकाळी ५.४४ नंतर) उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.  


"आज चांगला दिवस आहे." 

  

मेष:- उद्या पहाटे रवी युती हर्षल असणार आहे. अनुकूल ग्रहमान आहे. हातून चांगले काम घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. सिद्धी प्राप्त होतील.

     

वृषभ:- दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. मित्र मंडळी समवेत सहभोजन कराल. प्रवास घडतील. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा.

 

मिथुन:- ग्रहमान अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. विनाकारण एखाद्या प्रकरणात गोवले जाण्याची शक्यता आहे. 


कर्क:- ठीक ठाक दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. येणी वसुली होतील. शत्रू प्रबळ होईल.

 

सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल.  

  

कन्या:- चांगले ग्रहमान आहे. आरोग्य सुधारेल. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. घरगुती कामाला वाहून घ्याल.

 

तुळ:- आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल. सामाजिक कार्यात जपून व्यक्त व्हा.

 

वृश्चिक:- दिवस अनुकूल असला तरी एकूणच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल. नात्यात गैरसमज होऊ शकतात. 


धनु:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. सिद्ध व्यक्तीचा सत्संग लाभेल. दानधर्म कराल. गृह सजावट कराल. स्थावर संपत्तीवर लक्ष ठेवावे लागेल.  

 

मकर:- वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. अनुकूलता वाढेल. संध्याकाळ आनंदाची. एखादी स्फोटक घटना घडू शकते.

 

कुंभ:- चंद्र अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे हाती येतील. उत्साह वाढेल. संधीचे सोने करा.

 

मीन:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. एखाद्या थरारक घटनेतून तुम्हाला लाभ मिळू शकतो.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

Comments