नेपाळ येथील स्पर्धेत कोल्हापूरच्या जान्हवी लोढाचे दुहेरी यश : श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नेपाळ येथील स्पर्धेत कोल्हापूरच्या जान्हवी लोढाचे दुहेरी यश : श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नरके पन्हाळा पब्लिक स्कूलच्या जान्हवी राहुल लोढा हिने सुवर्ण आणि कास्य पदक जिंकून असे दुहेरी यश मिळवले.
शितो-रियो कराटे डो असोसिएशन,थामेल डोजो नेपाळ यांच्या वतीने काठमांडू नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या१० वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न झाली . नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळा ह्या शाळेची विद्यार्थिनी जान्हवी राहुल लोढा हिने काता प्रकारात सुवर्णपदक तर कुमिते(फाईट) प्रकारात कास्य पदकाचा बहुमान मिळवला
या स्पर्धेत नेपाळ बरोबर भारत, बांगलादेश,श्रीलंका,भूतान इत्यादी देश सहभाग झाले होते. जान्हवी ला मुख्याध्यापक सौ . महेश्वरी चौगुले , क्रीडा शिक्षक अमर मिरजे, अविनाश पाटील यांच्यासह संतोष क्षीरसागर , महेश भोकरे सतिश वडणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिची आता श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Comments
Post a Comment