नव्याने सुरू झालेल्या दुकानात महिलांची झाली गर्दी , वाहतुकीची प्रचंड कोंडी : पोलिसांनी दुकान बंद केले

नव्याने सुरू झालेल्या दुकानात महिलांची झाली गर्दी ,  वाहतुकीची प्रचंड कोंडी : पोलिसांनी दुकान बंद केले 



कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 
नेहमीच गजबजलेल्या असलेल्या असेंबली रोड जवळ आज  सुरू झालेल्या एका नव्या साडी विक्रीच्या दुकानात अचानक महिलांची प्रचंड गर्दी झाल्याने शाहपूरी पोलीस स्टेशनच्या हस्तक्षेपामुळे हे दुकान तातडीने बंद केले . समाजमाध्यमांवरून दिल्या गेलेल्या आकर्षक सवलतींच्या जाहिरातीमुळे या दुकानात खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या सवलतींचा लाभ घेण्यासाठी शहरातील तसेच उपनगरांतील महिलांनी चारचाकी, दुचाकी तसेच रिक्षांमधून गर्दी केली. त्यामुळे या परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठा वाहतूक कोंडीचा प्रकार घडला. या गर्दीमुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे गस्त पथक आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुकान चालकास विक्री त्वरित थांबविण्याचे आदेश दिले आणि दुकान ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलांना संयमाने घरी परतण्याचे आवाहन करत गर्दी पांगवली.योग्य स्वरूपात पार्किंगची व्यवस्था केल्यानंतरच पुन्हा विक्री सुरू करण्याची  सक्त सूचना   पोलिसांनी दुकान मालकास दिली आहे .

Comments