महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात 1.63 लाख नवीन ग्राहकांची नोंद - ट्राय

 महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल;  मे महिन्यात महाराष्ट्रात 1.63 लाख नवीन ग्राहकांची नोंद - ट्राय 


कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स जिओ ने मे  2025 मध्ये महाराष्ट्रात 1.63 लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिओ ने गेले 3 महिने आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने भर घातली आहे .


यासोबतच इतर टेलिकॉम ऑपरेटर्स ने मात्र नाममात्र भर घातल्याचे दिसून येते . ट्राय च्या आकडेवारीनुसार भारती एअरटेल 27111 तर व्होडा आयडिया ने 28000 नवीन ग्राहकांची भर घातली आहे तर बीएसएनएल कडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली असून 17000 ग्राहकांनी बीएसएनएल ला सोडचिट्ठी दीली आहे . 


राज्यात, फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस (FWA) क्षेत्रात जिओ  आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून,  जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. मे  2025 मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या 471170 इतकी झाली असून तुलनेत एअरटेल चे 133222 ग्राहक नोंदवले आहेत .  


जिओ च्या जलद नेटवर्क विस्तार, परवडणाऱ्या योजना आणि एकत्रित डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गृह व व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडतो आहे. शहरी व ग्रामीण भागांतून वेगवान इंटरनेटची वाढती मागणी लक्षात घेता, जिओ ही डिजिटल दरी मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Comments