दैनिक राशिभविष्य
🌞 रविवार, १९ ऑक्टोबर २०२५
🗓️ अश्विन कृष्ण त्रयोदशी
📅 विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
🪔 राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – संध्याकाळी ४.३० ते ६.००
चंद्र राशी – कन्या. (एइंद्र योग, विष्टी करणं शांती)
नक्षत्र – उत्तरा/हस्त.
आज वर्ज्य दिवस आहे, *दीप दान, उल्का दर्शन*
१९ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही चांगल्या आणि श्रीमंत घराण्यात जन्म घेतात. एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. मात्र वृत्ती संशोधक असते. स्वभाव तापट आणि हेकट असल्याने भांडणे होऊ शकतात. प्रेमप्रकरणात घाई करू नये. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा लाभते. तुम्हाला इतरांची लुडबुड सहन होत नाही. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास 'न' करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते. तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे.
व्यवसाय:- बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.
शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
♈ मेष:
आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा. घरगुती आनंद वाढेल. व्यवसायात नफा संभवतो. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग — नारिंगी.
♉ वृषभ:
प्रिय व्यक्तीकडून आनंददायक बातमी. आर्थिकदृष्ट्या लाभदायक व्यवहार होतील. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ.
♊ मिथुन:
घरातील जबाबदाऱ्या वाढतील पण समाधानही मिळेल. मित्रांशी संवादातून लाभ. प्रवासाचे योग.
♋ कर्क:
कामात काटेकोरपणा ठेवा. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आरोग्य चांगले राहील. घरात शुभ वातावरण.
♌ सिंह:
प्रेमसंबंध दृढ होतील. कामातील प्रगती समाधान देईल. मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी विश्रांती घ्या.
♍ कन्या:
नवीन संपर्कातून फायदा. आर्थिक बाबतीत स्थैर्य वाढेल. घरात धार्मिक वातावरण राहील. शुभ रंग — हिरवा.
♎ तुळ:
आजचा दिवस उत्साहवर्धक. नवे निर्णय फलदायी ठरतील. आत्मविश्वास वाढेल. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल.
♏ वृश्चिक:
अडकलेले काम मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. दुपारनंतर शुभ वार्ता मिळू शकते. प्रवास यशस्वी ठरेल.
♐ धनु:
कौटुंबिक आनंद वाढेल. नोकरीत बढती अथवा नवा प्रकल्प हाती घेण्याची संधी. आरोग्य उत्तम.
♑ मकर:
कामातील ताण वाढेल पण परिणाम समाधानकारक राहतील. संवाद कौशल्याने अडचणी दूर होतील. शुभ रंग — निळा.
♒ कुंभ:
विद्यार्थ्यांना उत्तम यश. आर्थिक लाभ. घरगुती वातावरण मंगलमय. प्रवासाचे योग शुभ.
♓ मीन:
मनात नवे विचार येतील. कला, संगीत, लेखन यांसाठी शुभ दिवस. सायंकाळी ध्यान केल्यास मानसिक समाधान लाभेल.
🕉️ आजचा उपाय:
रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि “ॐ घृणि सूर्याय नमः” हा मंत्र जपा — आरोग्य, यश आणि तेज वाढेल.
ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments
Post a Comment