भारतातील नंबर एकचे फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयल ओक फर्निचरचे कोल्हापुरातील नवीन स्टोअरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
भारतातील नंबर एकचे फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयल ओक फर्निचरचे कोल्हापुरातील नवीन स्टोअरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
भारतातील नंबर एकचे फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयल ओक फर्निचरचे कोल्हापुरातील नवीन स्टोअरचे उद्घाटन खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले.
संपूर्ण देशभरात २०० हून अधिक शाखा असलेल्या रॉयल ओक फर्निचरचे कोल्हापुरातील हे स्टोअर महाराष्ट्रातील प्रमुख स्टोअर होणार आहे. आपल्या दर्जेदार उत्पादनासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रॉयल ओक फर्निचरने सर्व वर्गासाठी सर्वोत्तम उत्पादने त्याचबरोबर सेवा देण्याचा मानस असल्याचा रॉयल ओक फर्निचरचे अध्यक्ष विजय सुब्रमण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जवळपास १५००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घराच्या प्रत्येक भागासाठी फर्निचरचा विस्तृत आणि मोठा संग्रह उपलब्ध आहे. लिविंग रूम , डायनिंग क्षेत्र, स्टडी रूम आणि ऑफिस आणि बरेच काही समाविष्ट आहे . दर्जेदार आणि माफक दरात फर्निचरच्या व्हरायटी ग्राहकांसाठी या स्टोअर मध्ये उपलब्ध असतील असेही रॉयल ओक फर्निचर कंपनीतर्फे सांगण्यात आले.
या स्टोअर च्या उद्घाटन प्रसंगी भगीरथजी छाबडा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय सिंधू सभा आणि अध्यक्ष सिंधी पंचायत धर्मशाळा इचलकरंजी, अमरलालजी निरंकारी क्षेत्रीय प्रभारी कोल्हापूर संत निरंकारी मिशन, रमेश भाई तनवाणी उपाध्यक्ष सिंधी समाज कोल्हापूर, संगीता भांबुरे अध्यक्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट , राजेंद्र खंडेराजुरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट इचलकरंजी, के पी खोत अध्यक्ष क्रीडाइ कोल्हापूर या मान्यवरासोबत रॉयल ओक फर्निचरचे फ्रांचाईशी भागीदार सचिन संजयकुमार नागदेव, विरेन भरत लखमानी , आदित्य भरत लखमानी आदी उपस्थित होते.

.jpg)


Comments
Post a Comment