आजचे राशिभविष्य
गुरुवार, २५ डिसेंम्बर २०२५.
पौष शुक्ल पंचमी/षष्ठी.
विश्वावसुनाम संवत्सर.
शके १९४७, संवत २०८२.
हेमंत ऋतू. उत्तरायण.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र – धनिष्ठा/शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(वज्र्य योग)
२५ डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुम्ही बुद्धिमान, प्रयोगशील आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहात. समाजात वेगळा ठसा उमटवण्याची क्षमता तुमच्यात आहे. स्वतंत्र विचारसरणीमुळे तुम्ही अनेकदा रूढी-परंपरांना छेद देता. मित्रपरिवार मोठा असतो, मात्र मोजक्यांवरच पूर्ण विश्वास ठेवता.
संशोधन, तंत्रज्ञान, लेखन, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात तुम्हाला विशेष गती मिळते.
कधी कधी अती-विचारामुळे मानसिक ताण येऊ शकतो.
रक्तदाब, स्नायू आणि मज्जासंस्थेशी संबंधित तक्रारींकडे लक्ष द्या.
शुभ रंग :- निळा, पांढरा
शुभ दिवस :- गुरुवार, शनिवार
शुभ अंक :- ४, ८
मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
रवी लाभ चंद्र योगामुळे प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळू शकते.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
चंद्र लाभ मंगळ योगामुळे कामाचा वेग वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. जमीन-जुमल्याशी संबंधित चर्चा पुढे सरकतील. संयम ठेवल्यास मोठा लाभ होईल.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आजचा दिवस प्रगतीचा आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. मात्र बोलताना शब्द जपून वापरा.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
चंद्र लाभ शुक्र योगामुळे कौटुंबिक सुख वाढेल. गृहसौख्य, वाहन किंवा दागिन्यांची खरेदी संभवते. महिलांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. आरोग्य मात्र जपा.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. नेतृत्वगुण प्रकट होतील. सामाजिक सन्मान मिळेल. संध्याकाळनंतर थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळ आहे. पोटाशी संबंधित तक्रारींकडे लक्ष द्या.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
व्यावसायिक विस्तारासाठी उत्तम दिवस. भागीदारीत लाभ होईल. कायदेशीर बाबी अनुकूल ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
उद्योगधंद्यात मोठी झेप घेण्याची संधी आहे. आर्थिक स्थैर्य मिळेल. गुप्त शत्रूंवर मात कराल. भावनिक निर्णय टाळा.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आत्मविश्वास वाढेल. अध्यात्मिक विचारांकडे कल वाढेल. नवीन शिक्षण किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा विश्वास मिळेल. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या. विश्रांती आवश्यक आहे.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
तुमच्या राशीत चंद्र असल्याने दिवस महत्त्वाचा आहे. नवीन योजना आखाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
चंद्र अनुकूल नसल्याने मन उदास राहील. कला, लेखन आणि अध्यात्मात प्रगती होईल. स्थलांतर किंवा निवासबदलाचा विचार पुढे सरकेल.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment