दैनिक राशिभविष्य

 🌟 दैनिक राशिभविष्य. 

 शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५




🌙 चंद्र: वृषभ राशीत | ✨ नक्षत्र: रोहिणी /मृगशीर्ष

📅 तिथी: मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा

🔱 योग: चंद्र प्रतियुती मंगळ • चंद्र केंद्र शनी • चंद्र केंद्र नेपच्यून

🌞 दक्षिणायन | ❄️ सौर हेमंत ऋतू | 🕉️ शके १९४७ | संवत २०८२

⭐ आजचा दिवस — अत्यंत शुभ, कार्यसिद्धीकारक

⚠️ राहू काळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आजचा दिवस मेहनतीतून मोठे परिणाम देणारा आहे.

मंगळ–चंद्र प्रतियुती ऊर्जेला वेग देते, शनी केंद्रस्थानी स्थैर्य व परिश्रमाचे फल देतो, नेपच्यून केंद्रामुळे अंतर्ज्ञान तीव्र होते. रोहिणी/मृगशीर्षामुळे सौंदर्य, संपन्नता, संवाद, व्यापार, आर्थिक विषय अत्यंत अनुकूल.



🌟 राशीभविष्य: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


🐏 मेष


कामात जबरदस्त गती. आर्थिक लाभ. परंतु रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नवी योजना पुढे जाईल. प्रेमसंबंधात ऊर्जितावस्था.


🐂 वृषभ


चंद्र आपल्या राशीत असल्याने दिवस अत्यंत शुभ. कोणतेही कार्य यशस्वी. आर्थिक स्थैर्य वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी.


👬 मिथुन


नवीन संपर्कातून फायदा. व्यवसायात वाढ. मानसिक चंचलता वाढू शकते. निर्णय शांतपणे घ्या. प्रवास शुभ.


🦀 कर्क


घर–कुटुंबात आनंद. आर्थिक लाभ. कामातील अडथळे दूर होतील. दुपारनंतर नवी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता.


🦁 सिंह


नोकरीत प्रगती. वरिष्ठांकडून कौतुक. आर्थिक स्थिती मजबूत. प्रेमसंबंधात रोमँटिक क्षण. आरोग्य चांगले.



🌾 कन्या


आजचा दिवस फलदायी. चर्चा, व्यवहार, कागदपत्रे यांत यश. दुपारी थोडी ताणतणाव शक्यता परंतु संध्याकाळी परिस्थिती सुधारेल.


⚖️ तुळ


भागीदारीत लाभ. नाती मजबूत होतील. आर्थिक विषय सांभाळून करा. सौंदर्य, कला, सजावट कार्यासाठी उत्तम दिवस.


🦂 वृश्चिक


कामात मोठे बदल शक्य. चंद्र–मंगळ योगामुळे जिद्द वाढेल. आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभ, परंतु तडक निर्णय टाळा.


🏹 धनु


नवीन शिकणे, प्रवास, परदेशी कामे यासाठी शुभ. आर्थिक लाभ. दुपारी मन अस्थिर राहू शकते. ध्यान, शांतता उपयुक्त.


🐐 मकर


जमीन, मालमत्ता, वाहन, बँकिंग विषयात शुभ फळ. कामात स्थैर्य. दुपारनंतर लाभदायक घटना.


🏺 कुंभ


मीटिंग, चर्चा, नेटवर्किंगमध्ये यश. मित्रांकडून मदत. चंद्र–शनी केंद्रामुळे निर्णय व्यावहारिक राहतील. व्यवसायासाठी दिवस चांगला.



🐟 मीन


अडकलेले पैसे मिळतील. नोकरीत प्रगती. अंतर्ज्ञानाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. भावनिक अस्थिरता थोडी वाटू शकते.


-ज्योतिषाचार्य मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments