रविवारी कोल्हापूर जिल्हा खुल्या अम्यँच्युर निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर जिल्हा खुल्या अम्यँच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक चार जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या स्पर्धा स्विस लिग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी उद्घाटनानंतर दहा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.या स्पर्धेत फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही वयोगटाचे महिला व पुरुष बुद्धिबळपटू सहभागी होऊ शकतात.या स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या सहा खेळाडूंची निवड रत्नागिरी येथे दि.16 ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या अम्यँच्युर (2300 गुणांकनाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूंना एकूण रोख पाच हजार रुपयाची बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे 1)रु.1000/-.2) रु.750/-, 3)रु.750/-4)रु.500/- 5) रु.500/- 6) रु.500/- .त्याचबरोबर 7, 9, 11, 13 व 15 वर्षाखालील मुलांना उत्तेजनार्थ प्रत्येकी दोनशे रुपये चे बक्षीस व मेडल्स देऊन सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय निवड झालेल्या पहिल्या सहा खेळाडूंना राज्य स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे.सहभागी सर्व खेळाडूंच्या जवळ आधार कार्ड ची कॉपी असणे आवश्यक आहे..तरी इच्छुक बुद्धिबळपटू नी आपली नावे शनिवार दिनांक 3 जानेवारी पर्यंत खालील व्यक्तींकडे नोंदवावीत...
1) आरती मोदी - 8149740405,
2) मनीष मारुलकर - 9922965173,
3) उत्कर्ष लोमटे - 9923058149,
4) प्रीतम घोडके - 8208650388,
5) रोहित पोळ - 9657333926
.jpeg)
Comments
Post a Comment