पाचगाव रणांगण तापलं! उजळाईवाडीत संग्राम पाटीलांची प्रचारात आक्रमक मुसंडी

 पाचगाव रणांगण तापलं! उजळाईवाडीत संग्राम पाटीलांची प्रचारात आक्रमक मुसंडी

पाचगाव मतदार संघामध्ये काँग्रेस उमेदवारांचा वैयक्तिक भेटीसाठी भर


कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाचगाव मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढत असून काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार संग्राम पाटील तसेच पंचायत समितीचे  डॉ. शिल्पा संदीप हजारे यांनी उजळाईवाडी परिसरात प्रचाराला आक्रमक वळण दिले आहे. थेट घराघरात जाऊन मतदारांशी वैयक्तिक भेटीगाठी घेत संग्राम पाटील यांनी जनतेशी थेट संवाद साधत प्रचारात मुसंडी मारली आहे.

उजळाईवाडीत झालेल्या या प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या. या सर्व मुद्द्यांवर विकासकेंद्रित आणि लोकाभिमुख राजकारण करण्याची ग्वाही संग्राम पाटील यांनी दिली.

“दिखाऊ प्रचार नव्हे तर प्रत्यक्ष काम आणि लोकांचा सहभाग हाच खरा विकासाचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या विकासात्मक धोरणांची माहिती मतदारांना दिली. वैयक्तिक संवादामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचा सूर उजळाईवाडीत उमटताना दिसत आहे.

या आक्रमक प्रचारामुळे पाचगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात प्रचार अधिक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Comments