आजचे राशिभविष्य
मंगळवार, ६ जानेवारी २०२६.
पौष कृष्ण तृतीया / चतुर्थी.
क्षय तिथी. विष्टी करण. अंगारकी चतुर्थी.
शके १९४७, संवत २०८२
हेमंत ऋतू. उत्तरायण.
विश्वावसुनाम संवत्सर.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०.
आज क्षय तिथी आहे.
*अंगारकी चतुर्थी* चंद्रोदय (मुंबई) ९.२१, (नाशिक) ९.१६.
ग्रहस्थिती:
रवी युती शुक्र, चंद्र केंद्र हर्षल.
भावनिक चंचलता, अचानक निर्णय, नवे विचार आणि बदलांची प्रवृत्ती वाढवणारा दिवस.
चंद्रनक्षत्र – (तृतीया/चतुर्थी नुसार)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/(दुपारी १२.१८ नंतर) सिंह.
मेष :-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज चंद्र केंद्रस्थानी असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कामात अडथळे येतील पण संयम ठेवल्यास मार्ग निघेल. वाहन चालवताना काळजी घ्या. गणपती उपासना लाभदायक.
वृषभ :-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. खर्चाचे प्रमाण जास्त राहील. स्त्री वर्गाकडून सहकार्य मिळेल. सौंदर्य, कला, सजावट यामध्ये रस वाढेल.
मिथुन :-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
नवीन ओळखी होतील. अचानक प्रवासाचे योग आहेत. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात. लेखन, माध्यम, व्यापार यासाठी दिवस अनुकूल.
कर्क :-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
व्यवसायात अचानक बदल करावे लागतील. वरिष्ठांशी मतभेद टाळा. भावनिक निर्णय घेऊ नका. माता आणि घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील.
सिंह :-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी संवाद ठेवा. कला, अभिनय, सादरीकरण यामध्ये यश मिळेल. अहंकार टाळा.
कन्या :-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संशोधन, चिकित्सा, विश्लेषण यामध्ये यश मिळेल. खर्च वाढेल पण आवश्यक ठरेल. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
तुळ :-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
व्यावसायिक भागीदारीत बदल संभवतात. शुक्र प्रभावामुळे प्रेमसंबंधात चढ-उतार येतील. सौंदर्यप्रसाधने, फॅशन क्षेत्र लाभदायक.
वृश्चिक :-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढतील. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. वाहन, जमीन विषयात निर्णय पुढे ढकला.
धनु :-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. उपासना फलदायी ठरेल. परदेश किंवा लांबच्या प्रवासाचे संकेत आहेत.
मकर :-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
व्यय वाढेल पण भविष्यासाठी गुंतवणूक होईल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. शेअर्स, अंदाज यात सावधपणा ठेवा.
कुंभ :-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अचानक लाभ संभवतो.
मीन :-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भावनिक चढ-उतार राहतील. कामाचा ताण वाढेल. कला, संगीत, अध्यात्म यात मन रमेल. विश्रांती आवश्यक.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
व्यवसाय, विवाह, भागीदारी, स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी संपूर्ण माहिती अल्प किमतीत जाणून घेण्यासाठी संपर्क करा – 8087520521


Comments
Post a Comment