- Get link
- X
- Other Apps
You
विकास विरुद्ध दिखाऊ राजकारण; संग्राम पाटील यांच्या प्रचाराचा पाचगावात शुभारंभ
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ पाचगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात करण्यात आला. माजी आमदार ऋतुराज पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराची विधीवत सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, “फक्त घोषणांचे राजकारण नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांवर जनतेचा विश्वास बसतो,” असे सांगत अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या दिखाऊ राजकारणावर टीका केली. सरपंच पदाच्या कार्यकाळात संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांनी पाचगावमध्ये राबवलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व युवकांसाठीच्या विकासकामांमुळेच आज जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाचगावच्या विकासाची हीच कामगिरी जिल्हा परिषदेत अधिक ताकदीने पुढे नेण्यासाठी मतदार संग्राम पाटील यांना निवडून देतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर रामाने, दिलीप जाधव, नारायण गाडगीळ, नारायण गाडगीळ यांच्यासह महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी पाचगावात उत्साहाचे व समर्थकांचे बळ दिसून आले.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment