सोशल मीडियावरून युवकांना आवाहन; कृष्णराज महाडिकांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात भव्य दुचाकी रॅली
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि युवकांना रविवारी होणाऱ्या भव्य स्वागत रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या संदेशानंतर शहरातील युवकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
दुपारी ४ वाजता कोल्हापुरात तब्बल २ हजार दुचाकींची भव्य रॅली काढण्यात येणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीसह त्यांचे जल्लोषी स्वागत केले जाणार आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी बॅनर, भव्य कटआऊट्स आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या संदेशात महाडिक यांनी “युवा शक्ती हीच परिवर्तनाची ताकद आहे” असा उल्लेख करत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागांतून युवक रॅलीसाठी तयारीला लागले आहेत.
रविवारी होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कोल्हापुरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Comments
Post a Comment