आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६.




फाल्गुन शुक्ल अष्टमी.

शके १९४७, संवत २०८२.

वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


आज उत्तम दिवस आहे.


चंद्रनक्षत्र - रोहिणी / (दुपारी १.३९ नंतर) मृगशीर्ष.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.


विषकुंभ योग.

चंद्र त्रिकोण मंगल, चंद्र केंद्र बुध, चंद्र केंद्र शुक्र – कार्यसिद्धी, आर्थिक लाभ आणि प्रेमसौख्य देणारे ग्रहमान.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

आज आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रपरिवारातून मदत मिळेल. नवीन कल्पना राबवाल. वाहन चालवताना काळजी घ्या. उतावळेपणा टाळा.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

मन काहीसे चंचल राहील. गुप्त लाभ संभवतो. प्रवासाचे नियोजन होईल. लेखन, संवाद यातून यश मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

मित्रांकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासाठी वेळ द्या.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. शब्दाला मान मिळेल. मात्र अहंकार टाळा.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. प्रवास योग संभवतो. संशोधन आणि अभ्यासात यश मिळेल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

भागीदारीत लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

कामाचा ताण वाढेल पण त्यातूनच यश मिळेल. शत्रू निष्प्रभ ठरतील. आरोग्यात सुधारणा होईल. संयम ठेवा.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

सर्जनशीलतेला वाव मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. अनपेक्षित लाभ संभवतो.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

लहान प्रवास संभवतो. भावंडांशी संबंध सुधारतील. धाडसी निर्णय घ्याल. कागदपत्रे तपासूनच सही करा.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा वाढेल. आध्यात्मिक कार्यात समाधान मिळेल. प्रलोभने टाळा.


-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments