कोल्हापूर–मुंबई हवाई प्रवासाला वेग; आता दररोज सकाळ-संध्याकाळ ‘इंडिगो’ची दुहेरी सेवा : खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाना यश
✈️ कोल्हापूर–मुंबई हवाई प्रवासाला वेग; आता दररोज सकाळ-संध्याकाळ ‘इंडिगो’ची दुहेरी सेवा : खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाना यश
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूर–मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये IndiGo कंपनीची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा २९ मार्चपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर विमानतळावर नवी टर्मिनल इमारत आणि विविध विकासकामे सुरू असताना ही नवी विमानसेवा पर्यटन, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी मोठी संजीवनी ठरणार आहे.
🛫 वेळापत्रक असे असेल
सकाळी ८.०० वाजता Navi Mumbai International Airport वरून विमान कोल्हापूरकडे उड्डाण घेईल.
सकाळी ९.१५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन.
सकाळी ९.३५ वाजता कोल्हापूरवरून परतीचे उड्डाण.
सकाळी १०.३५ वाजता नवी मुंबई विमानतळावर आगमन.
संध्याकाळी सत्र:
सायंकाळी ७.२० वाजता नवी मुंबईवरून कोल्हापूरकडे उड्डाण.
सायंकाळी ८.३० वाजता कोल्हापूर आगमन.
रात्री ८.५० वाजता कोल्हापूरवरून सुटणारे विमान
रात्री ९.५० वाजता नवी मुंबई येथे आगमन.
💼 व्यवसाय आणि पर्यटनाला चालना
दररोज सकाळी मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून संध्याकाळी कोल्हापूरला परत येणे आता सहज शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय, शासकीय कामकाज तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोल्हापूरकरांची प्रदीर्घ मागणी पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
💰 तिकीट दर
या मार्गावरील सुरुवातीचा तिकीट दर सुमारे ७,६०० रुपये इतका असणार आहे.
कोल्हापूर–मुंबई हवाई सेवेच्या या दुहेरी आणि दैनंदिन सुविधेमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment