भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय; उपांत्य फेरीची दारं उघडली
चेन्नई २६ सिटी न्यूज नेटवर्क
टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने दमदार कामगिरी करत झिम्बाब्वेवर ७२ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताचे उपांत्य फेरीचे गणित आता अधिक सोपे झाले असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सुपर 8 फेरीतील या महत्त्वाच्या सामन्यात भारत आणि झिंबाब्वे आमनेसामने आले होते. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून तब्बल २५६ धावांचा डोंगर उभारला. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वे समोर २५७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
मात्र, भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि शिस्तबद्ध मारा करत झिम्बाब्वेचा डाव २० षटकांत ६ बाद १८४ धावांवर रोखला. परिणामी भारताने हा सामना ७२ धावांनी जिंकत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या सामन्यात अष्टपैलू खेळाडू Hardik Pandya याने प्रभावी कामगिरी करत ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला. फलंदाजीसोबतच निर्णायक क्षणी घेतलेल्या विकेट्समुळे त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे झिम्बाब्वेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथमच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या झिम्बाब्वेला पुढील टप्प्यात मात्र अपेक्षित यश मिळाले नाही.
भारतासाठी मात्र हा विजय निर्णायक ठरला आहे. आता उपांत्य फेरीचे अंतिम समीकरण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून असणार असून त्या लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. 🏏🔥
.jpeg)
Comments
Post a Comment