आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६





. फाल्गुन शुक्ल एकादशी/द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


दुपारी १२.०० पर्यंत विशेष अनुकूल वेळ. त्यानंतर कार्यात संयम आवश्यक. आमलकी एकादशी


चंद्रनक्षत्र – आर्द्रा / (सकाळी १०.४९ नंतर) पुनर्वसू.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (विष्टी करण शांती करून घेणे)

(चंद्र त्रिकोण बुध, चंद्र युती गुरु, चंद्र त्रिकोण शुक्र, मंगळ केंद्र हर्षल – बुद्धिमत्ता, सौभाग्य व अनपेक्षित बदलांचे योग)


२७ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


तुमच्यावर बुध, गुरु आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि सौम्य वागणूक ही तुमची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही अभ्यासू, जिज्ञासू आणि संशोधनप्रिय आहात. नवीन गोष्टी शिकण्याची आवड प्रबळ असते. तुमच्यात अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर समतोल दिसून येतो.  


 तुम्ही मैत्रीपूर्ण स्वभावाचे असून लोकांना सहज आपलेसे करता. निर्णय घेताना विवेक वापरता. आर्थिक बाबतीत दूरदृष्टी ठेवता. कला, साहित्य, अध्यापन किंवा सल्लागार क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवू शकता.  


 प्रेमसंबंधात तुम्ही प्रामाणिक आणि भावनिकदृष्ट्या समंजस असता. जोडीदाराला प्रोत्साहन देणारे आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व तुमचे असते.


व्यवसाय:- अध्यापन, लेखन, सल्लागार, आयटी, ज्योतिष, बँकिंग, व्यवस्थापन, कला क्षेत्र.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

शुभ रंग:- हिरवा, पिवळा, पांढरा.

शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

चंद्र तृतीय स्थानी असल्याने धाडस वाढेल. संवादातून कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत. भावंडांकडून सहकार्य मिळेल. दुपारनंतर मानसिक चंचलता वाढू शकते.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

धनलाभाचे संकेत आहेत. चंद्र-गुरू युतीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

आज चंद्र तुमच्या राशीत अनुकूल आहे. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. मान-सन्मान वाढेल. नवीन संधी मिळतील. दुपारनंतर निर्णय घाईत घेऊ नका.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

काहीसा मानसिक ताण जाणवेल. गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. ध्यान-प्रार्थनेतून लाभ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

मित्रांकडून सहकार्य मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांची कृपा राहील. चंद्र-बुध शुभ योगामुळे नियोजन यशस्वी होईल. कौतुक होईल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

भाग्य साथ देईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. गुरु कृपेने अडथळे दूर होतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

संमिश्र दिवस. अचानक खर्च होऊ शकतो. गुप्त व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. भागीदारीत लाभ होईल. सार्वजनिक व्यवहारात यश. संयमाने वागा.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

कामाचा ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. कर्मचारी वर्गाकडून सहकार्य.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

संतानसौख्य लाभेल. सर्जनशील कामात प्रगती. प्रेमप्रकरणात सकारात्मक घडामोडी. आर्थिक लाभाची शक्यता.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

घरगुती वातावरण सुधारेल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. माता-पित्यांचे आशीर्वाद लाभतील. दुपारनंतर भावनिक निर्णय टाळा.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments