आजचे राशिभविष्य
🌞 शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
फाल्गुन शुक्ल द्वादशी/त्रयोदशी.
विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
🌙 चंद्र – कर्क राशीत.
⭐ नक्षत्र – पुनर्वसू (सकाळी ९.३५ पर्यंत), नंतर पुष्य.
✨ चंद्र त्रिकोण शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र त्रिकोण नेपच्यून, बुध युती शुक्र.
🌸 उत्तम दिवस.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती आनंद मिळेल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील. मातृसुख लाभेल. बुध-शुक्र युतीमुळे आर्थिक व्यवहारात चांगली प्रगती होईल. वाहन खरेदीचा विचार करू शकता.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस वाढेल. लहान प्रवास घडतील. भावंडांकडून सहकार्य मिळेल. चंद्र-शनी त्रिकोणामुळे कामात स्थैर्य येईल. नवीन करार फायदेशीर ठरतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ उत्तम होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बुध-शुक्र युतीमुळे बोलण्यात गोडवा येईल. प्रलंबित रक्कम मिळू शकते.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. चंद्र-हर्षल लाभ योगामुळे अचानक लाभ संभवतो. कलात्मक क्षेत्रात यश मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. मात्र अध्यात्मिक लाभ मिळेल. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे अंतर्ज्ञान वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
लाभ स्थानी चंद्र आहे. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. बुध-शुक्र युतीमुळे व्यवसायात नफा वाढेल. जुनी योजना यशस्वी होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
दशम स्थानी चंद्र आहे. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल. समाजात मानमरातब वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
भाग्य स्थानी चंद्र आहे. भाग्योदयाची चिन्हे दिसतील. प्रवासातून लाभ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. चंद्र-शनी योगामुळे दीर्घकालीन लाभ होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
अष्टम स्थानी चंद्र आहे. गुप्त लाभ संभवतो. संशोधनात्मक कामात यश मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च संभवतो. संयम ठेवा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील. सामाजिक संबंध दृढ होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
षष्ठ स्थानी चंद्र आहे. शत्रूंवर विजय मिळवाल. आरोग्य सुधारेल. कामाचा ताण कमी होईल. कर्ज व्यवहारात सुटका मिळेल. संयम राखा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
पंचम स्थानी चंद्र आहे. संततीसुख लाभेल. प्रेमसंबंध दृढ होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

Comments
Post a Comment