यशवंत बँकेचे चेअरमन महेश दिनकरराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 यशवंत बँकेचे चेअरमन महेश दिनकरराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

शिंगणापूर (ता. करवीर)  येथील प्रमुख चौकात मा. श्री. महेश दिनकरराव पाटील (चेअरमन – यशवंत बँक) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि आकर्षक फलक उभारून शुभेच्छा देण्यात आल्या. ‘अमर पाटील युवा मंच’च्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे परिसराचे लक्ष वेधले गेले.

फलकावर महेश पाटील यांचा छायाचित्रासह “मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेश देण्यात आला असून गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

यावेळी मंगेश सोहनी, सुनील वालीकर, अमित पितालिया तसेच ई सिटी न्यूज नेटवर्कचे संपादक सागर ठाणेकर आदी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शिंगणापूर गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Comments