बुद्धिबळ स्पर्धेत प्रेम निचळ, अथर्व कुंभार, आर्यन पाटील, श्रेयश पाटील व अद्विक विचारे संयुक्तपणे आघाडीवर

 बुद्धिबळ स्पर्धेत प्रेम निचळ, अथर्व कुंभार, आर्यन पाटील, श्रेयश पाटील व अद्विक विचारे संयुक्तपणे आघाडीवर



कोल्हापूर  २२ सिटी न्यूज नेटवर्क 

अनुज् चेस अकॅडमी व डी. आर. माने महाविद्यालय, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा वर्षांखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या फेरीअखेर पाच खेळाडूंनी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.

पहिल्या पटावर प्रेम निचळ (४ गुण) याने अच्युत डवणे याच्यावर विजय मिळविला. दुसऱ्या पटावर अथर्व कुंभार (४ गुण) याने दवेश पाटीलवर मात केली. तिसऱ्या पटावर आर्यन पाटील (४ गुण) याने सुराज गराडेवर विजय संपादन केला. चौथ्या पटावर श्रेयश पाटील (४ गुण) याने कार्तिक वडारला पराभूत केले. तर पाचव्या पटावर अद्विक विचारे (४ गुण) याने भगवान भारमलवर विजय मिळविला.

या स्पर्धेत चार मानांकित (फिडे रेटेड) खेळाडूंसह एकूण ८२ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवा बुद्धिबळपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन श्री. वीरेंद्र माने यांच्या हस्ते पटावरील पहिली चाल करून करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव श्री. कृष्णात पाटील, अनुज चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. बाबुराव पाटील, डी. आर. माने महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्रीनिवास पाटील तसेच प्रा. संग्राम तोडकर, प्रा. संतोष जेटीथोर व प्रा. विनायक खोत उपस्थित होते.

Comments