श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तुरंबे संचलित मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालयाचा NMMS मध्ये ८५% दणदणीत निकाल; ५५ विद्यार्थी उत्तीर्ण

 श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, तुरंबे संचलित मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालयाचा NMMS मध्ये ८५% दणदणीत निकाल; ५५ विद्यार्थी उत्तीर्ण




कोल्हापूर (तुरंबे)  २६ सिटी न्यूज नेटवर्क 

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मारुतीराव विष्णू वारके (आबाजी) विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, तुरंबे येथे इयत्ता आठवी NMMS परीक्षा सन 2025-26 च्या निकालात घवघवीत यश संपादन झाले आहे. एकूण ६४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सुमारे ८५ टक्के निकालाची नोंद झाली आहे. यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ११० पेक्षा अधिक गुण मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

मेहनत, गुणवत्ता, परंपरा आणि विश्वास – NMMS मध्ये तुरंबेचे मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालय खास!” या घोषवाक्याला साजेसा निकाल लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

⭐ गुणवंत विद्यार्थी ⭐

  1. कु. श्रेया दत्तात्रय चौगले – 159

  2. कु. सई संदीप देवर्डेकर – 152

  3. कु. राजनंदिनी सागर यरूडकर – 134

  4. कु. वसुंधरा कृष्णात साळोखे – 133

  5. कु. सृष्टी किरण भोईटे – 132

  6. कु. आराध्या संदीप यरुडकर – 128

  7. कु. सृष्टी सुनील परीट – 127

  8. कु. रामदास तानाजी कांबळे – 126

  9. कु. शरण्या मच्छिंद्र चौगले – 126

  10. कु. वैदेही नामदेव बुधाळे – 123

  11. कु. कस्तुरी विशाल चव्हाण – 118

  12. कु. मनोहर तानाजी डवरी – 117

  13. कु. विराज महेश सावंत – 117

  14. कु. आकाश युवराज पाटील – 112

  15. कु. श्रीधा संजय खामकर – 111

  16. कु. गंधर्व मदन येरुडकर – 110

संस्थापक अध्यक्ष मा. स्व. मारुतीराव विष्णू वारके (आबाजी) यांच्या प्रेरणेने आणि सचिव शंकररावजी मारुतीराव वारके (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था सातत्याने गुणवत्तेचा ध्यास घेत आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंत शंकरराव वारके, सचिव गौरव शंकरराव वारके तसेच मा. रमेशराव मारुतीराव वारके (माजी संचालक, बिद्री कारखाना) यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.

मुख्याध्यापक श्री. एस. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्गशिक्षक श्री. बी. ए. लोंढे तसेच श्री. आर. एस. कुदळे, श्री. व्ही. जे. साबळे आणि श्री. आर. बी. कांबळे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Comments