कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह; बाजारात विविध रंग आणि पिचकाऱ्यांची रेलचेल, बालचमूला जबरदस्त आकर्षण

 

कोल्हापुरात रंगपंचमीचा उत्साह; बाजारात विविध रंग आणि पिचकाऱ्यांची रेलचेल, बालचमूला जबरदस्त आकर्षण




कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

रंगपंचमीचा सण जवळ आल्याने कोल्हापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, रंगीत फुगे आणि होळीच्या साहित्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी आकर्षक आकारातील आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पिचकाऱ्यांनी बाजार गजबजला आहे.





यंदा बाजारात कार्टून, टँक, बंदूक, मोटार अशा विविध आकर्षक आकारातील पिचकाऱ्या उपलब्ध झाल्या असून त्या मुलांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तसेच गुलाल, ऑर्गॅनिक रंग, रंगीत फुगे आणि पाण्याचे बलून यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे.



रंगपंचमीच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत रंगांची उधळण करण्यासाठी तरुणाईही उत्सुक दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनाही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे.


दरम्यान, रासायनिक रंगांऐवजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments