आजचे राशिभविष्य
बुधवार, ११ मार्च २०२६.
फाल्गुन कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू. विश्वासूनाम संवत्सर शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज वर्ज्य दिवस आहे" *काळाष्टमी*
नक्षत्र - ज्येष्ठा / (रात्री १०.०० नंतर) मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक / (रात्री १०.०० नंतर) धनु.
(वज्र योग आणि नक्षत्र गंडांत शांती करून घेणे)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र ग्रहमान आहे. रवी केंद्र चंद्र असल्याने काही महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सरकारी कामातून अचानक लाभ मिळू शकतो. मात्र वाद टाळा. प्रवासात सावधगिरी बाळगा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. सरकारी भागीदारीतून लाभ मिळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होतील. मात्र खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात संयम ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामे पुढे धकलावी लागतील. शत्रूंवर मात करू शकाल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) पंचम स्थानी चंद्र आहे. प्रेमात यश मिळेल. कलात्मक कार्यात यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न राहील. समाजीक कार्यातून मात्र त्रास संभवतो.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती कामात वेळ जाईल. मालमत्ता किंवा वाहन विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. समाजकार्य करताना विरोधाचा सामना कारण लागेल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) तृतीय आणि चतुर्थ स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सूर्य नमस्कार आवश्यक आहेत. अभ्यासात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) द्वितीय स्थानी चंद्र आहे. अहंकार टाळणे हिताचे आहे. व्यावसायिक कौशल्य पणाला लागेल. छोटे प्रवास घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मात्र आज सावधपणे वाटचाल करावी लागेल. वेगळ्या वाटेने जावे लागेल. घरगुती कटकटीचे सामना करावा लागू शकतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. व्यवसाय उत्तम वाढेल मात्र वाहन चालवताना दंड होऊ शकतो किंवा सरकारी कामात दिरंगाई महागात पडू शकते.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) लाभ स्थानी चंद्र आहे. बोलण्यात कठोर नियंत्रण ठेवावे लागेल. संपत्ती बाबत काही वाद निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. तुमच्या राशीतील रविचा चंद्राशी केंद्र योग आहे. हा फारसा अनुकूल नाही. अहंकार नको. तुमच्या ताकदी बाहेरील कामाची जबाबदारी स्वीकारू नका. बोलताना काळजी घ्या.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) नवम स्थानी चंद्र आहे. उत्तम ग्रहमान आहे. अध्यात्मिक प्रगती होईल. काही गूढ आज उकलतील. सकाळी काहीसा अवघड कालावधी आहे. सरकारी कामे करताना सावधगिरी बाळगा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.)
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521

Comments
Post a Comment