चंबुखडी येथे ‘हिंदू एकता आंदोलन’च्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

 चंबुखडी येथे ‘हिंदू एकता आंदोलन’च्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन




कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 

शहरातील गणेश नगर, चंबुखडी येथे हिंदू एकता आंदोलन या संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी भगव्या वातावरणात आणि उत्साहात पार पडले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, तरुण बांधव आणि परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले की, कोल्हापूर शहरात शाखा विस्ताराचा वेग वाढत असून, तरुण पिढी कोणतीही अपेक्षा न ठेवता हिंदुत्ववादी कार्यासाठी स्वप्रेरणेने संघटनेशी जोडली जात आहे. नव्या शाखेमुळे परिसरातील सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कोल्हापूर महानगरपालिका चे नगरसेवक मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व भविष्यातही सहकार्य राहील, असे सांगितले.

नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा

चंबुखडी शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची यावेळी घोषणा करण्यात आली.

  • संदीप साळुंखे – शाखा प्रमुख

  • गणेश पाटील – उपशाखा प्रमुख

  • संतोष पाटील – खजिनदार

  • सूरज जाधव – सेक्रेटरी

या सोहळ्यास अनिरुद्ध कोल्हापूरे, अनिल गायकवाड, करवीर प्रमुख शिवाजी चिले, बाबू साखळकर, शहर प्रमुख विलास मोहिते, वैभव कवडे, हिंदुराव शेळके, नंदू आहीर, सुधाकर वडगावकर, अजित तोडकर, राजेंद्र करंबे, कुमार झारकुळी, किरण दाभोळकर, गणपत साळोखे, आशिष मुडेकर, राहुल मुडेकर, रवी गवळी, रवी माधव, विलास चिले यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments