संभाजीनगरातील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळात प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात
कोल्हापूर, ता. ११ सिटी न्यूज नेटवर्क
संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे मगरमठी येथे प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली.
उत्सवाची सुरुवात सकाळी सहा वाजता अभिषेकाने करण्यात आली. त्यानंतर सकाळी दहा वाजता ध्वजवंदन पार पडले तसेच मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. पुढे ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले.
संध्याकाळी धार्मिक वातावरणात हरिप्रिया महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. या निमित्ताने विशेष पूजाविधीही करण्यात आला.
दरम्यान, गुरुवार १९ मार्च रोजी सायंकाळी पालखी पूजन व प्रदक्षिणा होणार असून २० मार्च रोजी प्रगट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत मगर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment