लोकायत चषक बुद्धिबळ स्पर्धा कुरुंदवाड येथे उत्साहात संपन्न
आदित्य सावळकर, दिशा पाटील व वरद पाटील अजिंक्य;
श्रीराज भोसले, अथर्व तावरे व अदिराज डोईजड उपविजेते
कोल्हापूर (कुरुंदवाड), दि. २३ सिटी न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड चेस अकॅडेमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली लोकायत चषक जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने जैन सांस्कृतिक भवन, कुरुंदवाड येथे या स्पर्धा पार पडल्या. खुला गट, १७ वर्षाखालील व ११ वर्षाखालील अशा तीन गटांमध्ये स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय नियमांनुसार एकूण सात फेऱ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
खुल्या गटात कोल्हापूरच्या आदित्य सावळकर यांनी साडेसहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले. रेंदाळच्या श्रीराज भोसले यांनी सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर जयसिंगपूरच्या दिव्या पाटील यांनी साडेपाच गुणांसह तृतीय स्थान मिळवले.
१७ वर्षाखालील गटात जयसिंगपूरच्या दिशा पाटील यांनी सहा गुण व ३० टायब्रेक गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. इचलकरंजीच्या अथर्व तावरे यांनी सहा गुण व २९ टायब्रेक गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर विवान सोनी यांनी सहा गुण व २६ टायब्रेक गुणांसह तृतीय स्थान मिळवले.
११ वर्षाखालील गटात मिरजेच्या वरद पाटील यांनी सातही सामने जिंकत (७ पैकी ७ गुण) अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. वारणानगरच्या अदिराज डोईजड यांनी सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर सांगलीच्या अनिरुद्ध साळुंखे यांनी सहा गुण व टायब्रेकच्या जोरावर तृतीय स्थान मिळवले.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ₹३०००, ₹२००० व ₹१००० रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभासाठी इरिगेशन फेडरेशनचे प्रमुख विक्रांत पाटील (किणीकर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकायत कोल्हापूरचे आर. एस. आलासे, श्रीपाल आलासे, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कुरुंदवाडचे चेअरमन अरुण आलासे, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील, राजश्री शाहू पतसंस्थेचे माजी चेअरमन किरण आलासे, माजी नगरसेवक रसूल पट्टेकरी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, स्पर्धेचे मुख्य पंच मनीष मारुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून भरत चौगुले, मनीष मारुलकर, आरती मोदी, रोहित पोळ, करण परीट, विजय सलगर, प्रशांत धनवडे, किरण शिंदे व इंद्रजीत कर्वे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर. एस. आलासे, विनायक बिडकर, मनोज कुलकर्णी, स्वाती आंबाडे, वृषभ आलासे, यशोदा आलासे, श्रद्धा वळवडे-मगदूम, सचिन चिंचवाडे, सुभाष आलासे, सिद्धांत आलासे, सागर शेडबाळे, प्रतीक आलासे, निखील आलासे, रवि आलासे यांनी विशेष परिश्रम घेतले.
इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे :
खुला गट :
तन्मय पवार (इचलकरंजी), उमेश कुलकर्णी (मुंबई), अपूर्व कदम (कोल्हापूर), करण दबडे (इचलकरंजी), सम्मेद पाटील (इचलकरंजी), आदित्य कोळी (सांगली), प्रदीप नलावडे (बत्तीस शिराळ)
ज्येष्ठ गट (५५ वर्षावरील) :
अॅड. दिलीप कुलकर्णी (सांगली), अशोक माने (कसबे डिग्रज), सदाशिव कदम (कसबे डिग्रज), नागेंद्र भोसले (शिरोळ)
महिला गट :
श्रुती कुलकर्णी (जयसिंगपूर), रेश्मा नलवडे (इचलकरंजी), नेहा कटके (कोल्हापूर), कीर्ती मंडगनूर (इचलकरंजी), सिद्धी पाटील (शिरोळ)
शिरोळ तालुका गट :
संदीप पाटील, हेमंत भोसले, पियुष कदम, जितेंद्र पाटील, श्रेयस टोणपे
१७ वर्षाखालील :
आदित्य चव्हाण, अभय भोसले, पृथ्वीराज पाटील, आदित्य कोळी, नंदिनी सारडा, सर्वेश पोतदार, रुद्र माने
११ वर्षाखालील :
पृथ्वीराज पाटील, अवनिश जितकर, अथर्व कर्वेकर, गार्गी गुरव, रौनक झंवर, हर्ष मादनाईक, आहिल कोठावळे
१० वर्षाखालील :
शिवांश सुतार, अर्णव वरुटे, सिद्धेश करमलकर, शौर्य पाटील, आरुष पाटील
८ वर्षाखालील :
आरव पाटील, स्वयम चव्हाण, वाणी मालू, सुयोग काकाणी, सारांश अगरवाल

Comments
Post a Comment