‘स्व. हितेश स्मृती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत निर्वेद अजिंक्य; यश उपविजेता

  ‘स्व. हितेश स्मृती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत निर्वेद अजिंक्य; यश उपविजेता



कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

लहान मुलांवर चांगले संस्कार घडवायचे असतील, तर ते बालवयापासूनच करणे गरजेचे असून टीव्ही व मोबाईलच्या अति वापरापासून त्यांना दूर ठेवावे, असे आवाहन खेतुबाई अमिचंदजी राठोड परिवारातर्फे करण्यात आले.

नवकार फाउंडेशनतर्फे, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर संघ, गुजरी (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. हितेश नरेंद्र ओसवाल यांच्या स्मरणार्थ १५ वर्षांखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा ओसवाल भवन येथे उत्साहात पार पडली. यानिमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

स्पर्धेत निर्वेद अभिषेक ओसवाल याने सहापैकी एकही फेरी न हरता साडेपाच गुणांसह अजिंक्यपद पटकावले. तर यश ओसवाल यानेही एकही फेरी न गमावता पाच गुण मिळवून उपविजेतेपद मिळवले.

बक्षीस वितरण समारंभ खेतुबाई अमिचंदजी राठोड, नरेंद्र अमिचंदजी राठोड, डॉ. प्रकाश ओसवाल, राजू ओसवाल, निलेश ओसवाल, ऋषभ ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष राजेश निंबजिया, सचिव उत्तम ओसवाल, रतन गुंदेशा, बाबूलालजी रामसिना, रवी आंबेकर, अरविंद गांधी, प्रवीण ओसवाल, राजू बामणिया, वनेचंद राठोड, जयेश ओसवाल, दिलीप ओसवाल, पुष्पलता मंगल, बाबासाहेब मंगल, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बुद्धिबळ लेखनासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक रवी आंबेकर यांनी काम पाहिले.

इतर गटांतील विजेते पुढीलप्रमाणे :
🔹 ७ वर्षाखालील गट : केविन अमर ओसवाल, पारस निरोखेकर
🔹 ८ वर्षाखालील गट : युग गौरव ओसवाल, धून आशिष रायगांधी, मितांश अम्बेश पोरवाल, सुवंश निलेश जैन
🔹 ११ वर्षाखालील गट : जश अमित ओसवाल, पहल अमर ओसवाल, पावन महेश ओसवाल
🔹 १५ वर्षाखालील गट : नीर अमित ओसवाल, देव हितेश राठोड

स्पर्धेला खेळाडू व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Comments