गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘बालक मंदिर क्र. १’ मध्ये नूतन विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेश

 गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘बालक मंदिर क्र. १’ मध्ये नूतन विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेश 




कोल्हापूर, १९ सिटी न्यूज नेटवर्क 

गुढी पाडवा च्या शुभमुहूर्तावर दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित ‘बालक मंदिर क्र. १’ येथे नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला विधिवत सुरुवात करण्यात आली. 



विशेष म्हणजे, आजच्या या मंगलदिनी काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येत प्रवेश घेतला असून, त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. 



१९२१ पासून शैक्षणिक क्षेत्रात भक्कम परंपरा असलेल्या या संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शिशु गट, छोटा गट आणि मोठा गट या स्तरांमध्ये प्रवेश उपलब्ध असून पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले.

या शाळेची वैशिष्ट्येही विशेष लक्षवेधी आहेत. हवेशीर व प्रशस्त वर्गखोल्या, ई-लर्निंगची सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि मुलांसाठी सुसज्ज खेळाची बाग अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध शैक्षणिक अॅक्टिव्हिटीजवर भर दिला जातो. 



मराठीसोबत सुरुवातीपासून इंग्रजी शिक्षणाची सोय असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच हस्ताक्षर, पाठांतर, फॅन्सी ड्रेस, कथाकथन यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना वाव दिला जातो.

इतर शाळांच्या तुलनेत परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही या संस्थेची खासियत असून सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही उत्तम संधी ठरत आहे.


Comments