आजचे राशिभविष्य
🌞 मंगळवार, ३ मार्च २०२६
फाल्गुन पौर्णिमा. शिशिर ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
चंद्रनक्षत्र – मघा (सकाळी ७.३२ पर्यंत)/ नंतर पूर्वा फाल्गुनी.
राशी – सिंह.
ग्रहण दिवस – वर्ज्य दिवस.
धुलिवंदन. करी दिन. खग्रास चंद्रग्रहण.
रवी प्रतियुती चंद्र,
चंद्र प्रतियुती बुध,
चंद्र लाभ गुरू.
३ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरूचा प्रभाव आहे. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. इतरांच्या भावना सहजपणे समजावून घेतात, सहानुभूती असते, प्रेम असते त्यामुळे इतरांशी संवाद साधणे शक्य होते. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. प्रतिष्ठा जपतात. वृत्ती धार्मिक असते आणि गूढ गोष्टींकडे ओढा असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. स्वभाव उत्साही आहे. कोणतेही प्रश्न तुम्ही अभ्यासपूर्ण रीतीने सोडवतात. दिरघोद्योगी आहात. बुद्धिमान आणि संशोधक लोकांकडे तुमचा ओढा असतो. सर्वसाधारण लोकांमध्ये मिसळणे तुम्हाला फारसे पसंत नसते. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. आत्मविश्वास भरपूर असतो. स्वतःला निर्णयक्षमता असते. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. वृत्ती आनंदी असते. मन तरुण असते. मैदानी आणि शारीरिक खेळांची आवड असते. तुम्ही एक विश्वास पात्र व्यक्ती आहात.
व्यवसाय:- न्यायाधीश, धर्मगुरू, शिक्षक, तत्वज्ञानी, मुत्सद्दी, सचिव, डॉक्टर, प्रवचनकार, अभिनय, जाहिरात क्षेत्र, संरक्षण खाते.
शुभ दिव:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग - पिवळा, हिरवा, जांभळा
"आज संयम, जप-तप आणि आत्मपरीक्षणासाठी विशेष दिवस आहे."
आजचे राशिभविष्य
मेष:-
पंचम चंद्र लाभदायक आहे. संततीकडून आनंदवार्ता मिळेल. परंतु ग्रहणामुळे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जप-तप करा.
वृषभ:-
चतुर्थ चंद्र घरात अस्थिरता निर्माण करू शकतो. कुटुंबात किरकोळ मतभेद संभवतात. शांतता राखा.
मिथुन:-
तृतीय चंद्र धैर्य देईल. प्रवास टाळावा. बुध प्रतियुतीमुळे संभाषणात गैरसमज होऊ शकतो.
कर्क:-
द्वितीय चंद्र आर्थिक बाबतीत सावधगिरी सांगतो. खर्च वाढू शकतो. बोलण्यात संयम ठेवा.
सिंह:-
राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल पण अहंकार टाळा. ग्रहणामुळे मानसिक चंचलता वाढू शकते. ध्यान करा.
कन्या:-
द्वादश चंद्र खर्च आणि चिंता वाढवू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
तुळ:-
लाभस्थानी चंद्र गुरूच्या दृष्टीत आहे. अचानक लाभ संभवतो. मित्रपरिवारासोबत वेळ जाईल.
वृश्चिक:-
दशम चंद्र करिअरमध्ये बदलाचे संकेत देतो. वरिष्ठांशी मतभेद टाळा. संयमाने वागा.
धनु:-
भाग्यस्थानी चंद्र गुरू लाभ देईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्यतो पुढे ढकला.
मकर:-
अष्टम चंद्र सावधगिरी सांगतो. आरोग्य जपा. गुप्त शत्रूपासून सावध रहा.
कुंभ:-
सप्तम चंद्र दाम्पत्य जीवनात संवेदनशीलता वाढवेल. गैरसमज टाळा. भागीदारीत संयम ठेवा.
मीन:-
षष्ठ चंद्र स्पर्धेत यश देईल. कामाचा ताण वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी कृपया संपर्क करा.

Comments
Post a Comment