महिला दिनी समाजमन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद

 महिला दिनी समाजमन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद : कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळींनी दिली विकलांग तरुणाला आर्थिक मदत



कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क 

मंगळवारपेठेतील विकलांग तरुण राजू जगताप या अंथरुणावर असलेल्या युवकाच्या कुटुंबीयांसाठी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला महिला दिनी मोठा प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करून या आवाहनाला उत्तर दिले.

राजू जगताप हा तरुण गेल्या काही वर्षांपासून अंथरुणावर आहे. त्याचे वडील सुमारे दहा वर्षांपासून बेपत्ता असून, त्याची आई रोजच्या खर्चासह औषधोपचाराचा भार उचलत आहे. समाजमन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष महेश गावडे यांनी या कुटुंबाला मदतीचा आश्वासन देऊन महिला दिनाच्या निमित्ताने आर्थिक मदत सुपूर्द केली.

इचलकरंजीतील दैनिक महासत्तामध्ये , राजू जगताप हे पूर्वी अॅफिसबॉय म्हणून काम करत होते. २०२३ मध्ये सायकलीच्या अपघातामुळे ते विकलांग झाले. त्यानंतर समाजमन संस्थेने परिस्थितीचा मागोवा घेत, मदतीसाठी लोकांचा आवाज उभा केला. याआधी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने ऑनलाइन गीत मैफल आयोजित करून सुमारे पाच हजार रुपयांची मदत या कुटुंबाला दिली होती.

महिला दिनी मिळालेल्या या मदतीबाबत राजूच्या आईने समाजमन संस्थेसह देणगीदारांचे आभार मानले. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमामुळे विकलांग, गरजू तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळत आहे.

Comments