कागलमध्ये २२ मार्चला १७ वर्षाखालील मुलांसाठी जलद बुद्धिबळ स्पर्धा; रोख बक्षिसांसह ४७ पारितोषिके
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
श्रीमंत नारायणीराजे अखिलेशसिंहराजे घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे १७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २२ मार्च रोजी ही स्पर्धा होणार असून न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल, कागल यांच्या वतीने तसेच अनुज चेस अकॅडमीच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल येथे पार पडणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रु. १५००, द्वितीय क्रमांकासाठी रु. १०००, तृतीय क्रमांकासाठी रु. ७००, चौथ्या क्रमांकासाठी रु. ५०० आणि पाचव्या क्रमांकासाठी रु. ३०० अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय १५ चषक आणि ३२ पदके देण्यात येणार असून एकूण ४७ बक्षिसे स्पर्धकांना मिळणार आहेत.
स्पर्धा १७ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुला-मुलींसाठी एकत्रित होणार आहे. यासाठी जन्मतारीख १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतरची असणे आवश्यक आहे. तसेच १५ वर्षांखालील (१/१/२०११ नंतर), १३ वर्षांखालील (१/१/२०१३ नंतर), ११ वर्षांखालील (१/१/२०१५ नंतर), ९ वर्षांखालील (१/१/२०१७ नंतर) आणि ७ वर्षांखालील (१/१/२०१९ नंतर) या वयोगटांमध्येही स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी इच्छुकांनी दि. २१ मार्चपर्यंत सहभाग नोंदवावा. सर्व सहभागी स्पर्धकांना अल्पोपहार आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट आणि चेस क्लॉक घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), राजू कचरे (८५३०४५५९४७), अनुष्का पाटील (९३०७२९५८४८) आणि अनुराग पाटील (८६०५७३२७३१) यांच्याशी संपर्क साधावा.
.jpeg)
Comments
Post a Comment