कागल शालेय बुद्धिबळ स्पर्धा – ओजस व्हनमाने अजिंक्य
कोल्हापूर (कागल), दि. 23 – सिटी न्यूज नेटवर्क
श्रीमंत नारायणीराजे अखिलेशसिंहराजे घाटगे (कागल ज्युनियर) यांच्या वाढदिवसानिमित्त अनुज् चेस अकॅडमी आणि न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल यांच्यावतीने यशवंतराव घाटगे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कागल येथे 17 वर्षाखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत अखिलेशसिंहराजे घाटगे यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेत ओजस व्हनमाने यांनी अच्युत दावणे यांना पराभूत करत 6 पैकी 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले, तर श्रवण ठोंबरे यांनी 6 पैकी 5 गुण मिळवून उपविजेते ठरले.
इतर मुख्य विजेते:
तृतीय क्रमांक: व्यंकटेश खाडेपाटील – 5 गुण
चौथा क्रमांक: आरुष ठोंबरे – 5 गुण
पाचवा क्रमांक: संस्कार वनीरे – 5 गुण
सहावा क्रमांक: सोमनाथ हजारे – 5 गुण
सातवा क्रमांक: अमेय कुलकर्णी – 4.5 गुण
आठवा क्रमांक: श्रीयोग कोरवी – 4 गुण
उत्कृष्ट विद्यार्थिनी:
शमिता पाटील – 3 गुण
इतर वयोगटांचे विजेते:
7 वर्षाखालील: प्रथम – शिवराज कामते (4 गुण)
9 वर्षाखालील: प्रथम – जय पाटील; द्वितीय – रिशिता देशमाने; तृतीय – श्रीनय पालनकर; चौथा – पार्थ सुतार; पाचवा – अंशराज चव्हाण (प्रत्येकी 3 गुण)
11 वर्षाखालील: प्रथम – ऋतुजा हेंडगे; द्वितीय – ओम इंगळे; तृतीय – शिवराज फडतारे; चौथा – शौर्य पाटील; पाचवा – अमृता खेडकर (प्रत्येकी 3 गुण)
उत्कृष्ट विद्यार्थिनी: स्पृहा दावणे – 2 गुण
13 वर्षाखालील: प्रथम – शिवतेज कामते; द्वितीय – आयुष जाधव; तृतीय – सार्थक घुले (4 गुण)
उत्कृष्ट विद्यार्थिनी: ईश्वरी शिंदे – 3 गुण
15 वर्षाखालील: प्रथम – अच्युत दावणे; द्वितीय – यश हेंडगे (5 गुण)
अनुज् चेस अकॅडमी विजेते: प्रथम – समर्थ घुले; द्वितीय – भगवान भारमल; तृतीय – स्वरूपराज पाटील; चौथा – हार्दिक चव्हाण; पाचवा – अथर्व आंबी; सहावा – नुबेद मुजावर; सातवा – कृष्णराज चव्हाण
उत्तेजनार्थ बक्षीस: शौर्य कटके
स्पर्धेत एकूण 65 स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमात श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे, श्रीमंत मृगनयना राजे घाटगे, श्रीमंत अखिलेशसिंहराजे घाटगे, श्रीमंत शिवानीराजे घाटगे, कागल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत (भैय्या) रावण, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव श्री कृष्णात पाटील, अनुज् चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री बाबूराव पाटील, न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कलचे राजू कचरे आणि यशवंतराव घाटगे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस पाटील उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजित इंगळे आणि अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment