आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

शुक्रवार, २० मार्च २०२६. 




चैत्र शुक्ल द्वितीया. पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज शुभ दिवस आहे. *बालचंद्रमा व्रत*  


चंद्रनक्षत्र - रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ तर गुरुशी केंद्र योग् आहे. तुमच्या व्यय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील आणि स्वतःच्या आनंदासाठी खर्च देखील कराल. महिलांकडून लाभ मिळतील. नात्यात काही गैरसमज संभवतात.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) लाभ स्थानी चंद्र आहे. लक्ष्मीची कृपा राहील. भौतिक सुखे प्राप्त होतील. धर्म कार्यात सहभागी व्हाल. भाग्योदय होईल. कलाकारांना अनपेक्षित यश मिळेल.


 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दशम चंद्र आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडतील. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील.   


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नवम चंद्र- शुक्र आहे. संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज घेऊ शकतात. सहल घडेल. नवीन मित्र मैत्रिणी मिळतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) असत स्थानी चंद्र आहे. सोबत शुक्र आहे. सासुरवाडी कडून लाभ मिळतील. खर्चात वाढ होईल. अनुकूल गुरू शुभ लाभ मिळवून देतील.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. शुभ समाचार समजतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी बढती चे योग आहेत.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसाय वाढीसाठी उत्तम ग्रहमान आहे. आज तुमचा व्यस्त दिवस असणार आहे. तरीही वेळात वेळ काढून कुलदेवतेचे दर्शन घ्या. 

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या तडक फडके स्वभावाला साजेसा दिवस आहे. कामे पूर्ण होतील. प्रेमात यश मिळेल. चांगली बातमी समजेल. मात्र गुरुचे बळ नाहीये. 

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवीन घर खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. वाहन सौख्य लाभेल. छोटी सहल घडेल. घराची रंगरंगोटी आणि दुरुस्ती कराल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अर्थपूर्ण दिवस आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. नात्यातून मदत मिळेल. अडचणी दूर होतील मात्र आज कष्ट अधिक करावे लागणार आहेत.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या बोलण्यावर आज बरेच काही अवलंबून आहे. रुचकर मेजवानी मिळेल. कामे मार्गी लागतील. भाग्य उजळेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आणि शुक्र आहेत. शुक्र उच्च आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. वास्तू बाबत काही अडथळे येऊ शकतात.    


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments