कुरुंदवाडमध्ये ‘लोकायत चषक’ बुद्धिबळ स्पर्धेला उत्साही सुरुवात; आदित्य, अर्णव, अभय, दिशा, अथर्व, वरद, अवनीश व अधिराज आघाडीवर

 कुरुंदवाडमध्ये ‘लोकायत चषक’ बुद्धिबळ स्पर्धेला उत्साही सुरुवात; आदित्य, अर्णव, अभय, दिशा, अथर्व, वरद, अवनीश व अधिराज आघाडीवर

श्रीमती विनया घोरपडे व स्मिता आलासे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून लोकायत बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना यावेळी डावीकडून मनीष मारूलकर मनीष मारुलकर,विनायक बिडकर, सतीश कुलकर्णी, किरण शिंदे, आर्.एस्. आलासे, प्रशांत धनवडे, भरत चौगुले, अविनाश बिडकर व सच्चिदानंद आवटी


कोल्हापूर (कुरुंदवाड) २२ सिटी न्यूज नेटवर्क 
जैन सांस्कृतिक भवन, कुरुंदवाड येथे कुरुंदवाड चेस अकॅडमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकायत चषक’ खुल्या व वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माजी व्हाईस चेअरमन सौ. विनया घोरपडे व सौ. स्मिता आलासे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव व मुख्य पंच मनीष मारुलकर, लोकायत कोल्हापूरचे आर. एस. आलासे, तसेच विनायक बिडकर, सच्चिदानंद आवटी, अविनाश बिडकर, रसूल पट्टेकरी, प्रशांत धनवडे व मनोज कुलकर्णी उपस्थित होते.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, बेळगाव, रायबाग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, राधानगरी, वारणानगर येथील तब्बल १९२ बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, त्यापैकी ५५ खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकनधारक आहेत.

ही स्पर्धा खुला गट, १७ वर्षाखालील गट व ११ वर्षाखालील गट अशा तीन विभागांत स्विस लिग पद्धतीने एकूण सात फेऱ्यांमध्ये खेळवली जात आहे.

चौथ्या फेरीनंतरची स्थिती पुढीलप्रमाणे:

👉 खुला गट:
कोल्हापूरचा आदित्य सावळकर चार गुणांसह आघाडीवर. श्रीराज भोसले (रेंदाळ), दिव्या पाटील (जयसिंगपूर) व प्रदीपकुमार नलवडे (बत्तीसशिराळ) हे साडेतीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर.

👉 १७ वर्षाखालील गट:
सांगलीचा आदित्य चव्हाण, ठाण्याचा आदित्य कदम, जांभळीचा अभय भोसले व जयसिंगपूरची दिशा पाटील हे चौघेही चार गुणांसह संयुक्त आघाडीवर.

👉 ११ वर्षाखालील गट:
मिरजेचा वरद पाटील व वारणानगरचा अधिराज डोईजड चार गुणांसह आघाडीवर, तर सांगलीचा पृथ्वीराज पाटील साडेतीन गुणांसह द्वितीय स्थानावर.

स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांमध्ये चुरशीचे सामने होण्याची अपेक्षा असून, स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Comments