कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी संसदेत खास विधेयक; खासदार धनंजय महाडिक यांचा कारागिरांच्या उपजिविकेसाठी पुढाकार

 

कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी संसदेत खास विधेयक; खासदार धनंजय महाडिक यांचा कारागिरांच्या उपजिविकेसाठी पुढाकार



कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 
कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पल आणि पारंपारिक चर्मकलेचे जतन व विकास करण्यासाठी खासदार Dhananjay Mahadik यांनी संसदेत विशेष विधेयक मांडले आहे. स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्चित करण्याच्या उद्देशाने हे विधेयक सादर करण्यात आले आहे.

सध्या नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असून त्यामध्ये खासदार महाडिक यांनी “Kolhapuri Leather Craft Preservation and Livelihood Security Bill” या नावाने हे महत्त्वपूर्ण विधेयक मांडले. या विधेयकाचा उद्देश कोल्हापुरी चप्पलसह पारंपारिक चर्म उद्योगाला संरक्षण, स्थिरता आणि प्रोत्साहन देणे हा आहे.

राज्यसभेत विधेयक सादर करताना खासदार महाडिक यांनी कोल्हापुरी चप्पल आणि इतर चर्म उत्पादनांचा देश-विदेशात प्रचार व विकास करणे, पारंपारिक कलेचे जतन व संरक्षण करणे आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या रोजगाराची सुरक्षा अबाधित ठेवणे हे या विधेयकाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

कोल्हापुरी चप्पल ही केवळ कोल्हापूरचीच नव्हे तर भारताची ओळख बनलेली आहे. जगभरात या चप्पलांना मोठी मागणी असून विविध प्रकारच्या चर्म उत्पादनांनाही बाजारपेठ उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत पारंपारिक चर्म उद्योगाला बळ देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मांडलेले हे विधेयक अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Comments